Liver cancer early symptoms saam tv
लाईफस्टाईल

Liver cancer early symptoms: लिव्हरचा कॅन्सर सुरू होण्यापूर्वी शरीरात दिसतात मोठे ७ बदल; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

7 major signs of liver cancer: यकृत कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे कारण त्याची सुरुवातीची लक्षणे सहसा खूप अस्पष्ट असतात किंवा ती इतर सामान्य आरोग्य समस्यांशी जुळतात. यामुळे रुग्ण किंवा डॉक्टरही सुरुवातीला त्याला गांभीर्याने घेत नाहीत.

Surabhi Jayashree Jagdish

  • लिव्हर कॅन्सर हा जीवघेणा आजार असून जगातील कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचे एक प्रमुख कारण आहे.

  • यकृताच्या पेशींमध्ये अनियंत्रित वाढ होऊन कर्करोग निर्माण होतो; त्यातील सर्वात सामान्य प्रकार हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा (HCC) आहे.

  • सुरुवातीची लक्षणे अस्पष्ट असल्याने रोग वेळीच ओळखणे कठीण जाते, ज्यामुळे उपचारात उशीर होतो.

यकृताचा कर्करोग म्हणजेच लिव्हर कॅन्सर हा एक अत्यंत घातक आणि जीवघेणा आजार मानला जातो. जगभरात कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे यकृताचा कॅन्सर. कोणालाही हा आजार होऊ शकतो. या आजारात यकृताच्या पेशींमध्ये नकारात्मक बदल होऊन वाढ सुरू होते. यकृताच्या कॅन्समध्ये सगळ्यात सामान्य प्रकार म्हणजे हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा (HCC). याव्यतिरिक्त बायल डक्ट कॅन्सर किंवा फिब्रोलॅमेलर कार्सिनोमा हे दुर्मिळ प्रकारही आढळतात.

या आजारात मोठी अडचण म्हणजे सुरुवातीची लक्षणं फारसा वेगळेपण न दाखवता हळूहळू दिसून लागतात. त्यामुळे तो वेळीच ओळखणं कठीण जातं. यामुळे निदान उशिरा झाल्याने उपचार करणं अधिक अवघड होतं. अशावेळी काही सुरुवातीची लक्षणं ओखळणं फार गरजेचं आहे.

वजन झपाट्याने कमी होणं

लिव्हर कॅन्सरचं हे एक सुरुवातीचं लक्षण आहे. जर तुमचं वजन अचानक कमी होत असेल तुम्ही कोणतंही डाएट करत नसाल, तर हे सावध व्हा. शरीरात कॅन्सर वाढत असल्यामुळे यकृताच्या पोषण प्रक्रियेवर परिणाम होतो आणि शरीराची उर्जा कमी होत जाते. त्यामुळे शरीरात चरबी कमी होऊन वजन झपाट्याने कमी होऊ लागतो.

भूक मंदावणं

यकृत हे पचनासाठी खूप महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे यकृतावर परिणाम झाला तर भूक आपोआप कमी होऊ लागते. यकृताचा कॅन्सर असलेल्या व्यक्तींना थोडं खाल्लं तरी लगेच पोट भरल्यासारखं वाटतं. याला ‘अर्ली सॅटायटी’ म्हणतात. हा बदल शरीराच्या पचन प्रक्रियेवर कॅन्सरचा परिणाम झाल्यामुळे होतो.

पोटाच्या वरच्या भागात दुखणं

पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला ज्या ठिकाणी यकृत असतं तिथे सतत दुखत असेल तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. कधी कधी हे दुखणं खांद्यापर्यंत किंवा पाठीतही जाणवतं. अनेकदा हे लक्षण वेगळ्या कारणांमुळे देखील जाणवू शकतं.

मळमळ आणि उलट्या

जर तुम्हाला सतत मळमळत असेल किंवा कारण नसताना वारंवार उलट्या होत असतील तर यकृताच्या कार्यावर परिणाम झाला असल्याची शक्यता असते. यकृत नीट काम करत नसेल तर संपूर्ण पचन क्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे उलट्या होऊ शकतात. हे लक्षण दीर्घकाळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा.

थकवा आणि अशक्तपणा

आराम केल्यानंतरसुद्धा सतत थकवा जाणवणं हे सामान्य वाटणारं पण गंभीर लक्षण आहे. शरीर जेव्हा कॅन्सरशी लढत असतं, तेव्हा खूप उर्जा खर्च होते. त्यामुळे नॉर्मल थकव्यासारखा न वाटणारा पण कायमचा असणारा थकवा जाणवतो.

कावीळ

त्वचा किंवा डोळ्यांच्या पांढऱ्या भागाला पिवळसरपणा येणं म्हणजे कावीळ. यकृत रक्तातून बिलीरुबिन नावाचं द्रव बाहेर टाकू शकत नाही त्यामुळे ही परिस्थिती आढळते. यासोबत त्वचेला खाज येणं, लघवीचा रंग गडद होणं, मलाचा रंग फिकट होणं अशी लक्षणंही दिसतात.

पोट फुगणं आणि पाणी साचणं

कधी कधी यकृताच्या आजारामुळे पोटात पाणी साचून पोट फुगायला लागतं. याला ‘अॅसाइटिस’ म्हणतात. हे खूप त्रासदायक असू शकतं. याशिवाय पायांमध्येही सूज येऊ शकते. हा दोन्ही लक्षणं यकृत नीट कार्य करत नसल्याचं दर्शवतात.

इतर काही लक्षणं

  • त्वचेला सतत खाज येणं

  • कोणताही संसर्ग नसताना ताप येणं

  • पोटावर मोठ्या रक्तवाहिन्या दिसून येणं

  • सहजपणे शरीरात गाठ तयार होणं

लिव्हर कॅन्सरचे सर्वात सामान्य प्रकार कोणते?

लिव्हर कॅन्सरचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा (HCC) .

लिव्हर कॅन्सरचे एक सुरुवातीचे लक्षण कोणते?

अचानक आणि कारण नसताना वजन कमी होणे हे लिव्हर कॅन्सरचे एक सुरुवातीचे लक्षण आहे.

‘अर्ली सॅटायटी’ म्हणजे काय?

थोडे खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटणे याला ‘अर्ली सॅटायटी’ म्हणतात; हे लिव्हर कॅन्सरचे लक्षण आहे.

कावीळ का होते?

यकृत बिलीरुबिन नियंत्रित करू शकत नसल्यामुळे त्वचा व डोळे पिवळे पडतात, यालाच कावीळ म्हणतात

पोटात पाणी साचण्याचे वैद्यकीय नाव काय?

पोटात पाणी साचण्याचे वैद्यकीय नाव अॅसाइटिस आहे, जे यकृताच्या अपुर्या कार्याचे लक्षण आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिकेट विश्वावर शोककळा, ऑस्ट्रोलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूचं निधन

Jai Jawan Govinda Pathak: नऊ थरांनंतर आता दहा थरांचा विक्रम घडवण्यासाठी जय जवान पथक सज्ज|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

Javed Akhtar: 'तुझ्या पूर्वजांनी ब्रिटिशांचे बूट चाटले...'; 'पाकिस्तानी' म्हटल्याने जावेद अख्तर भडकले, ट्रोलरची केली बोलती बंद

Green Tea: रोगप्रतिकारकशक्ती आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे ग्रीन टी

SCROLL FOR NEXT