Swelling in heart causes and treatment saam tv
लाईफस्टाईल

Early signs of heart inflammation: हृदयाला सूज आल्यास सुरुवातीला शरीरामध्ये दिसतात ७ मोठे बदल; दुर्लक्ष करणं बेतू शकतं जीवावर

Swelling in heart causes and treatment: हृदय सूजणे या स्थितीला वैद्यकीय भाषेत मायोकार्डिटिस असं म्हणतात. जी हृदयाच्या स्नायूंना किंवा हृदयाभोवतीच्या आवरणाला सूज येते. ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल हृदयासंबंधीच्या अनेक समस्या आपल्याला सतावतात. यापैकी एक म्हणजे हृदयाला सूज येणं. हृदयात सूज येणं ही एक गंभीर आरोग्याची परिस्थिती मानली जाते. ही एक अशी स्थिती आहे जी कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये होऊ शकते. वैद्यकीय भाषेत या स्थितीला मायोकार्डिटिस म्हणतात.

या स्थितीमध्ये हृदयाच्या स्नायू आणि नसांमध्ये सूज येते. परिणामी हृदयाला रक्त योग्यरित्या पंप करण्यात अडचण येऊ शकते. रक्त पंप करू न शकल्याने हृदयाशी संबंधित गुंतागुंत वाढू शकते. काही गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णाचे हृदय इतके कमी होतात की, शरीराच्या इतर भागांपर्यंत रक्त पोहोचणं कठीण होतं. यावेळी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या परिस्थितींचा धोका देखील वाढू शकतो.

हृदयाला सूज आल्यावर काय होतं?

हृदयाच्या स्नायू किंवा बाह्य थराला सूज येण्याला मायोकार्डिटिस किंवा पेरीकार्डिटिस म्हणतात. ही परिस्थिती शरीरात विषाणू, संसर्ग किंवा हानिकारक पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे होते. यामुळे हृदयाची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते. कधीकधी सामान्य सर्दी, फ्लू किंवा कोविड-१९ सारख्या इन्फेक्शनंतर हा त्रास होऊ शकतो.

वेळेवर काळजी न घेतल्यास ही परिस्थिती प्राणघातक देखील ठरू शकते. परंतु जर लक्षणं लवकर लक्षात आली आणि काही योग्य ती काळजी घेतली की परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून वाचू शकते.

हार्टला सूज येण्याची लक्षणं

  • छातीत दुखणं किंवा जडपणा

  • विश्रांती घेत असतानाही श्वास घेण्यास त्रास होणं

  • खूप थकवा जाणवणं

  • जलद किंवा अनियमित हृदयाचे ठोके

  • पायांमध्ये सूज येणं

  • गुडघ्याखालील भागात सतत सूज येणं

  • चक्कर येणं किंवा अशक्त होणं

मुख्य गोष्ट म्हणजे सहसा लोकं ही लक्षणं क्षुल्लक मानतात. कारण, पोटात गॅस तयार होणं किंवा वाढलेली चिंता यासारख्या परिस्थितीतही अशीच लक्षणं दिसू शकतात. परंतु, ही लक्षणं हृदयाला सूज येण्याची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Gallbladder Problems: 'ही' 4 लक्षणं दिसली तर समजा पित्ताशयात झालेत खडे; 99% लोकं करतात दुर्लक्ष

Vande Bharat Express : सोलापूरला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस, कुठून कुठे धावणार? वाचा सविस्तर माहिती

Twinkle Khanna: 'आजकालची मुलं कपड्यांप्रमाणे पार्टनर बदलतात...'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या विधानावर नेटकरी संतप्त

EPFO News : EPFO ने केला मोठा बदल! पीएफ ट्रान्सफरसाठी HR ची गरज नाही, नोकरी बदलल्यावर २ दिवसात पैसे ट्रान्सफर होणार

SCROLL FOR NEXT