Salt intake saam tv
लाईफस्टाईल

Salt intake: जास्त प्रमाणात मीठाच्या सेवनाने होतायत त्वचेच्या गंभीर समस्या, संशोधनातून मोठा खुलासा

Salt intake: जर तुम्ही दररोज जास्त प्रमाणात मीठाचं सेवन करत असाल तर सावधान व्हा. नुकत्याच केलेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. ज्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ खाण्याने तुमच्या त्वचेला सूज येण्याची समस्या उद्भवू शकते.

Surabhi Jagdish

आपल्याला प्रत्येकाला जेवणामध्ये मीठाची ही गरज असते. जेवणामध्ये जर मीठाचं प्रमाण नसेल किंवा कमी असेल तर त्याची चव अळणी लागते. आपल्यापैकी काही लोकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. मात्र तुम्हाला माहितीये का, तुमची ही सवय धोकादायक आहे. जर तुम्ही दररोज जास्त प्रमाणात मीठाचं सेवन करत असाल तर सावधान व्हा.

जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हायपरटेन्शनचा धोका किंवा मधुमेहाचा धोका वाढतो. मात्र कदाचित तुम्हाला माहिती नसेल, मात्र जास्त प्रमाणात मीठ खाणं तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. नुकत्याच केलेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. ज्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ खाण्याने तुमच्या त्वचेला सूज येण्याची समस्या उद्भवू शकते.

जास्त प्रमाणात मीठ खाणं त्वचेसाठी धोकादायक?

मीठामध्ये सोडियमचं प्रमाण असतं. जे शरीरातील पाण्याचं संतुलन राखण्यास मदत करतं. परंतु जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त प्रमाणात मीठाचं सेवन करतो त्यावेळी शरीरात सोडियमचं प्रमाण वाढतं. अशावेळी शरीरात पाण्याची कमतरता होते. याचा परिणाम थेट तुमच्या त्वचेवर होतो. यामुळे त्वचा कोरडी, तिस्तेज होऊ लागते. अशावेळी डोळ्यांखाली असलेल्या त्वचेवर देखील परिणाम होतो.

रिसर्चमधून काय झाला खुलासा?

नुकतच एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनानुसार, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने त्वचेच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. यामुळे त्वचेवर सूज येणं, एक्जिमा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. एक्जिमा ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये त्वचेवर वारंवार खाज सुटू लागते. याशिवाय त्वचेवर लाल चट्टे देखील येतात.

संशोधनाद्वारे असंही समोर आलंय की, ज्या व्यक्ती जास्त फास्ट फूड किंवा जंक फूड खातात त्यांना एक्जिमाचा धोका वाढतो. कारण फास्ट फूडमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ही त्वचेची समस्या उद्भवू शकते.

मीठाच्या सेवनाचं प्रमाण कमी कसं करावं?

  • प्रोसेस्ट किंवा पॅकबंद केलेले पदार्थ खाणं टाळा

  • जेवणादरम्यान वरून मीठ घेऊ नये

  • लोणचं, चटणी तसंच पापड यांचं सेवन कमी करा

  • काळं मीठ किंवा सैंधव मीठाचा वापर करा

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : काहींना लक्ष्मी प्राप्तीसाठी सुसंधी मिळतील, तर कोणाला होईल आजाराचे निदान, तुमची रास काय?

Raosaheb Danve: खरंच नेते म्हणायचं का? फोटोत येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी मारली लाथ

Daily Horoscope: आजचा शुभ दिवस देणार बरंच काही; वाचा तुमचे राशीभविष्य

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

SCROLL FOR NEXT