Blood sugar: जेवणानंतर लगेच वाढते साखरेची पातळी? 'या' सोप्या उपायांनी करा कंट्रोल

Blood sugar: जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. यावेळी ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास पद्धती सांगणार आहोत.
Blood sugar
Blood sugarsaam tv
Published On

मधुमेहाचं निदान झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला आहाराची पथ्य पाळावी लागतात. याशिवाय वेळेवेळी ब्लड शुगर लेवल म्हणजेच रक्तातील साखरेची तपासणी ठेवावी लागते. जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. यावेळी ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास पद्धती सांगणार आहोत.

या टीप्सच्या माध्यमातून तुम्ही शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करू शकता. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येणं, आरोग्यासाठी देखील उत्तम मानलं जातं. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये धोका कमी करण्यासाठी जेवल्यानंतर शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढू लागते. ज्याला पोस्टप्रॅन्डियल हायपरग्लायसेमिया म्हणतात.

ग्लाइसेमिक इंडेक्स

हे एक मापाचं प्रमाण असून कोणत्या अन्नपदार्थ रक्तात किती लवकर विरघळून साखरेची पातळी वाढवतात, हे समजतं. कमी GI असलेले अन्नपदार्थ हळूहळू पचतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशावेळी तुमच्या आहारात संपूर्ण धान्य, शेंगा, फळे यांसारख्या कमी GI पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

किती प्रमाणात खाणं खाल?

तुम्हाला माहितीये का, आरोग्यासाठी उत्तम असलेले खाद्य पदार्थ देखील जास्त प्रमाणात खाल्ल्याने ब्लड शुगर लेवलमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशावेळी आपण किती प्रमाणात खाल्लं पाहिजे याकडे लक्ष दिलं पाहिजे. यासाठी तुम्ही छोट्या ताटाचा वापर करू शकता.

Blood sugar
Girls Elope From Home : अत्याचारांच्या घटनांवर मौन पण एक प्रेमविवाह मान्य नाही? पळून गेलेल्या मुलीचे मनोगत, VIDEO पाहून तुम्हालाही कोसळेल रडू

जेवणानंतर शारिरीक हालचाल गरजेची

शारीरिक हालचालींमुळे तुमच्या शरीराला ग्लुकोज अधिक चांगल्या पद्धतीने वापरण्यास मदत होऊ शकते. अशावेळी जेवणानंतर लगेच झोपणं योग्य नाही. यावेळी काही प्रमाणात चालणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

आहारात फायबरयुक्त पदार्थांचा करा समावेश

फायबरमुळे कार्बोहायड्रेट्सचे पचन आणि शोषण कमी होण्यास मदत होते. परिणामी ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते. विरघळणारे फायबर हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या आहारात ओट्स, चिया सिड्स यांचा समावेश फायदेशीर ठरेल.

भरपूर पाणी प्या

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली की डिहायड्रेशनचा त्रास होतो. यावेळी या त्रासामुळे रक्तातील साखरेची पातळी स्पाइक होऊ शकतात. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

Blood sugar
Ganesh Chaturthi Prasad : फक्त ३ गोष्टींपासून बनवा खुसखुशीत आणि गोड बालुशाही; गणेशोत्सवात बनवा सिंपल स्विट रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com