Financial Planning SAAM TV
लाईफस्टाईल

भारतीयांमध्ये Financial Planning चा गंभीर अभाव; 5 पैकी 2 व्‍यक्‍तींकडे 4 महिने पुरेल इतका आपत्‍कालीन निधी

Serious lack of financial planning among Indians: भारतातील वाढत्या वेतनामुळे आणि जीवनशैलीमुळे लोकांचे उत्पन्न वाढले असले, तरी आजही बहुतांश भारतीयांमध्ये वित्तीय नियोजन आणि आणीबाणी निधी तयार करण्याबाबत गंभीर अभाव दिसून येत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एचडीएफसी लाइफने एक नवीन संशोधन आधारित अहवाल ‘रेडी फॉर लाइफ’ जाहीर केला आहे. या अहवालात लोकं आपण किती आर्थिकदृष्ट्या तयार आहेत असं वाटतं आणि प्रत्यक्षात ते किती तयार आहेत यामध्ये मोठी तफावत असल्याचं स्पष्ट झालं आहे. देशभरातल्या संशोधनानुसार, भारताचा अनुमानित रेडी फॉर लाइफ इंडेक्स (RLI) ८५ पॉइंट्स आहे, पण प्रत्यक्षात तो फक्त ५९ आहे. म्हणजेच भारतातील शहरी लोकांमध्ये आर्थिक तयारीत तब्बल २६ पॉइंट्सची तफावत आहे.

या संशोधनात आर्थिक नियोजन, आपत्कालीन तयारी, आरोग्य आणि स्वास्थ्य, आणि निवृत्ती धोरण या चार प्रमुख आधारस्तंभांवर भारतातील शहरी लोकांची तयारी तपासली गेली. या चार आधारस्तंभांपैकी निवृत्तीनंतरचं जीवन हे सर्वात मोठं अंतर असलेलं क्षेत्र आहे. तीनपैकी दोन लोकांनी निवृत्तीचं नियोजन केलं असलं तरी ते कुटुंबाकडून आधार मिळेल अशी अपेक्षा ठेवतात.

काहींनी निवृत्तीसाठी बचत सुरूच केली नाही

जवळपास निम्म्या शहरी लोकांनी अजून निवृत्तीसाठी बचत सुरूच केलेली नाही. जे लोक बचत करतात त्यांना वाटतं की, ५० लाख ते १ कोटी रुपयांचा निधी १७ वर्ष पुरेल. पण महागाई आणि जीवनशैली खर्च पाहता ही रक्कम अपुरी आहे. निवृत्ती तयारीत आत्मविश्वास आणि कृती यामध्ये तब्बल ३७ पॉइंट्सचं अंतर आहे.

आपत्कालीन निधी आणि आरोग्य विम्याबाबतही तफावत दिसून आली. पाचपैकी दोन लोकांकडे फक्त चार महिने टिकेल इतकाच आपत्कालीन निधी आहे. पाचपैकी दोन लोकांकडे आरोग्य विमा आहे, पण त्याचं कव्हरेज ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. जरी पाचपैकी चार लोक नियमित व्यायाम करतात आणि दोनपैकी एकजण दरवर्षी आरोग्य तपासणी करतो, तरीही विमा कव्हरेज अपुरं आहे.

भारतीयांचा कल अजूनही पारंपारिक बचतीकडे

भारतीय ग्राहकांचा कल अजूनही पारंपारिक बचतीकडे आहे. यामध्ये एंडोमेंट योजना, मुदत ठेवी, सोनं यांचा समावेश आहे. टर्म इन्शुरन्ससारख्या किफायतशीर संरक्षण साधनांचा वापर कमी आहे. यामागे उत्पादनाबद्दल कमी माहिती, क्लेम सेटलमेंटबद्दल गैरसमज आणि पॉलिसीधारक पॉलिसी मुदतीपेक्षा जास्त काळ जगल्यास प्रीमियम परत मिळत नाही ही चुकीची धारणा कारणीभूत आहे. लोक बचत करतात, पण ती जास्त करून लघुकालीन ध्येयांसाठी असते. दीर्घकालीन गुंतवणुकीत खरी संधी आहे, जी स्थिर संपत्ती निर्माण करू शकते आणि कमी वाढ देणाऱ्या साधनांवरील अवलंबन कमी करू शकते.

प्रादेशिक फरक मोठ्या प्रमाणात

या अहवालात ही दिसून आले. उत्तर भारतात आपत्कालीन आणि निवृत्ती नियोजनात कमकुवतपणा असल्यामुळे तफावत सर्वाधिक म्हणजे ३० पॉइंट्स आहे. पूर्व भारतात तफावत कमी म्हणजे २० पॉइंट्स असून बचतीत शिस्तबद्ध दृष्टिकोन दिसतो. दक्षिण भारत आर्थिक आणि आरोग्य नियोजनात परिपक्वतेत आघाडीवर आहे. पश्चिम भारतात गुंतवणुकीत वैविध्य आहे, पण दीर्घकालीन नियोजन कमी आहे.

‘रेडी फॉर लाइफ इंडेक्स २०२५’ हा एचडीएफसी लाइफचा मालकीचा संशोधन उपक्रम आहे. हे संशोधन स्वतंत्र बाजारपेठे संशोधन कंपनी इप्सोस इंडियाद्वारे करण्यात आलं आहे. मेट्रो, द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमधील २५ ते ५५ वर्ष वयोगटातील काम करणाऱ्या पुरुष आणि महिलांसोबत १,८३६ समोरासमोर मुलाखती घेऊन हा अभ्यास केला गेला. या इंडेक्सचा उद्देश अनुमानित आणि प्रत्यक्ष तयारीमधील तफावत दाखवणे आहे, ज्यामुळे लोकांना लघुकालीन बचतींपासून दीर्घकालीन आर्थिक नियोजनाकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळेल.

या अहवालातून स्पष्ट होतं की लोकांमध्ये जागरूकता आणि आशावाद आहे, पण प्रत्यक्ष तयारी अजूनही पाहिजे तशी नाहीये. ग्राहक स्पष्टपणे निवृत्तीनंतरच्या जीवनाबाबत ध्येये आखतात, पण त्यांच्या आर्थिक कृती आणि उत्पादन निवडीमुळे ही ध्येये पूर्ण करणे आव्हानात्मक ठरू शकते. या अहवालातून भारतात दीर्घकालीन आर्थिक नियोजन, निवृत्तीची स्वतंत्र तयारी आणि आर्थिक साक्षरतेची गरज खूप मोठी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर जिल्हा सत्र न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

Nidhhi Agerwal : संतापजनक! धक्काबुक्की अन् गैरवर्तन केले; अभिनेत्रीला चाहत्यांकडून वाईट वागणूक, VIDEO पाहून राग अनावर होईल

BOI Recruitment: खुशखबर! बँक ऑफ इंडियात नोकरी अन् १.२० लाख रुपये पगार; अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय? वाचा

Haldi Kunku Gift Idea : बेस्ट हळदी–कुंक वाण आयडिया, उपयोगी आणि बजेटमध्ये बसणाऱ्या खास वस्तू

SCROLL FOR NEXT