Secrets Of Longer Life  Saam Tv
लाईफस्टाईल

Secrets Of Longer Life : दीर्घ आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा

Longer Life Secrets : तुमच्या आजूबाजूला असे काही लोक नक्कीच असतील, ज्यांच्या चेहऱ्यावरून वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. म्हातारपणातही त्यांची चपळता तारुण्यासारखीच राहते. संशोधनातून असे दिसून आले आहे की, तणावापासून दूर राहून तुम्ही तुमचे आयुष्य अनेक वर्षे वाढवू शकता.

Shraddha Thik

Lifestyle :

तुमच्या आजूबाजूला असे काही लोक नक्कीच असतील, ज्यांच्या चेहऱ्यावरून वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. म्हातारपणातही त्यांची चपळता तारुण्यासारखीच राहते. संशोधनातून असे दिसून आले आहे की, तणावापासून (Stress) दूर राहून तुम्ही तुमचे आयुष्य अनेक वर्षे वाढवू शकता.

परंतु हे एकमेव कारण नाही. यामध्ये इतरही अनेक गोष्टींचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्ही दीर्घ आणि आनंदी आयुष्य (Happy Life) जगू शकता. तुमचीही अशी इच्छा असेल तर जाणून घ्या त्याचे काही रहस्य.

हलके अ‍ॅक्टिव्हीटीज करा

अनेक रिसर्चमध्ये हे सिद्ध झाले आहे की, काही दैनंदिन शारीरिक हालचाली केवळ तुम्हाला तंदुरुस्त ठेवत नाहीत तर तुमचे आयुष्य वाढवण्यासही मदत करतात. मग ते पायऱ्या चढणे असो, बागकाम असो, फिरणे असो किंवा योगासने असो. शारीरिक हालचाली वाढत्या वयानुसार होणाऱ्या आजारांपासूनही संरक्षण करतात.

Socially अ‍ॅक्टिव्ह

जे लोक सामाजिकरित्या सक्रिय असतात ते सामान्य लोकांपेक्षा जास्त काळ आणि आनंदी आयुष्य जगतात. त्यामुळे कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवा. जर ते खूप व्यस्त असतील तर आठवड्यातून एक किंवा दोनदा त्यांच्याशी बोलणे पुरेसे असेल.

तणावापासून दूर राहा

काम, कुटुंब, जबाबदारी, आरोग्य अशा अनेक गोष्टींमुळे आयुष्यातील ताणतणाव वाढतात, पण जर तुम्हाला तुमचे शरीर आणि मन निरोगी ठेवायचे असेल, तर तणाव दूर करण्याच्या उपायांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वर नमूद केलेल्या दोन्ही क्रिया तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

तुमचा मेंदू व्यस्त ठेवा

जर तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर तुमचे मन सक्रिय ठेवा. ते सक्रिय ठेवण्यासाठी नवीन गोष्टी जाणून घ्या. हे नवीन भाषेपासून नवीन साधन, माइंड गेम्स इत्यादी काहीही असू शकते.

स्वतःला आनंदी ठेवा

तुम्हाला आनंद देणार्‍या गोष्टी करण्यासाठी वेळ काढा. यामुळे शरीरात आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे सर्व प्रकारचे तणाव दूर होतात. जो आतून आनंदी असतो तोच दीर्घायुष्य जगू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT