Chetan Bodke
काहीही कार्यक्रम असेल, कोणाचं अभिनंदन करायचं असेल किंवा कोणाचं स्वागत करायचं असेल तर आपण टाळ्या वाजवतोच.
पण तुम्हाला ठाऊक आहे का, टाळ्या वाजवल्यामुळे आपण अनेक आजारांवर आपण मात करु शकतो.
नुसत्या टाळ्या वाजवून आपण स्वत:ला निरोगी ठेवू शकतो. टाळ्या वाजवल्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होतात जाणून घेऊया.
जर दररोज टाळ्या वाजवल्या तर संधिवात बरा होऊ शकतो. त्यामुळे बोटांमध्ये होणारे रक्ताभिसण सुरळित होते.
जर हाताला लकवा मारला असेल किंवा हात थरथरत असतील तर रोज टाळ्या वाजवाव्यात त्यामुळे बोटांमध्ये होणारे रक्ताभिसण सुरळित होते.
हृदयविकार, फुफ्फुस आणि यकृताचे आजार असतील तर तुम्ही दररोज टाळ्या वाजवाव्यात.
अनेकदा आपली प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे टाळ्या वाजवल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते. यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते.
मधुमेह आणि दमा यांसारखे आजार जर तुम्हाला असतील तर दररोज टाळ्या वाजवाव्यात. त्यामुळे मधुमेह आणि दमासारखे आजार होण्याची शक्यता कमी होईल.
तुमचे केस जास्त प्रमाणात गळत असतील तर दररोज टाळ्या वाजवाव्यात. टाळ्या वाजवल्याने त्याचा केसांना फायदा होतो. तळवे आणि बोटांच्या नसा थेट मेंदूशी जोडलेल्या असतात.
जेवल्यानंतर टाळ्या वाजवाव्यात. त्यामुळे शरीरामध्ये फॅट जमा होत नाही. जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर हा उपाय करावा.
हाताच्या नसा मेंदूसोबत जोडलेल्या असतात. टाळ्या वाजवल्याने स्मरणशक्ती वाढते. आणि सांधेदुखीही दुर होते.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.