Chetan Bodke
ड्रायफ्रूटमध्ये असलेल्या अंजीरच्या सेवनाने आपले आरोग्य सुदृढ राहते. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.
अंजीर कच्चे आणि सुके दोन्ही पद्धतीने खाल्ले जातात. अंजीरमध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्ब आणि फायबर यांसारखे गुणधर्म उपलब्ध असतात.
शरीर सुदृढ ठेवण्यासाठी अंजीरचे सेवन केले जाते. अंजीरचे नियमित सेवन केल्यामुळे शरीराला आवश्यक खनिजे मिळतात.
रक्तामध्ये शुगरचे प्रमाण जास्त असल्यास अंजीराचे सेवन करू शकता.
अंजीरमध्ये पोटॅशियम आणि क्लोरोजेनिक ऍसिडचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील शुगरचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
पोटासंबंधित समस्या कमी करण्यासाठी अंजीराचे सेवन केले जाऊ शकते. अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण योग्य असते.
अंजीरमध्ये झिंक, मॅगनीज, मॅग्नेशियम आणि लोह जास्त प्रमाणात असते, जे पुनरुत्पादक आरोग्यास प्रोत्साहन देते.
शरीराचे वाढते वजन कमी करण्यासाठी अंजीरचे सेवन देखील केले जाऊ शकते. वजन कमी करण्यासाठी शरीराला भरपूर फायबर असलेले अन्न हवे असते, जे अंजीर पुरवू शकते.
ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी अंजीराचे सेवन केले जाऊ शकते. अंजीरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट ब्लडप्रेशर कमी करण्यात मदत करते.
त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अंजीरचे सेवन करू शकता. अंजीरच्या पाण्याचे रोज सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.
सदर लेख सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी आपल्या डॉक्टरांसोबत संपर्क साधावा.