Chetan Bodke
खराब जीवनशैली आणि अनियमित खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेकदा पोटदुखीची समस्या जाणवते.
अशा स्थितीत काहीही खाऊ नका असं सांगितले जाते. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. जर तुम्हीही पोटाच्या समस्येने त्रस्त असाल तर आहारात हलक्या गोष्टी खा.
अपचन जर होत असेल तर पोटातही जळजळ होते. अपचनाच्या समस्या जर तुम्हालाही त्रास होत असेल तर दही खावे.
पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. जर रोजच्या आहारामध्ये पपईचा समावेश केल्यास पचनक्रिया मजबूत राहते.
खरंतर, आल्यामध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात. पोटासंबंधित आजार असतील तर आल्याचा चहा प्यावा. त्यामुळे पोटासंबंधित अनेक समस्या दूर होतील.
अपचन होत असल्यास ओट्स खावे. जर ओट्सचे रिकाम्या पोटी सेवन केले तर, ते शरीरासाठी खूप बेस्ट ठरते. ओट्समध्ये भरपूर फायबर असते जे पोट दीर्घकाळ भरून ठेवते.
अपचनच्या समस्येमुळे पोटाच्या समस्येने जर तुम्हीही त्रस्त असाल तर, पुदिन्याचे सेवन करावे. पुदिन्याचे सेवन केल्यामुळे पोटाला आराम मिळेल.
सदर लेख सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी आपल्या डॉक्टरांसोबत संपर्क साधावा.