Chetan Bodke
आपण कायमच घरगुती जेवणामध्ये पांढऱ्या मिठाचा वापर करतो. पण मिठाच्या अतिवापरामुळे व्यक्तीला बीपी, कॉलेस्ट्रोल सारखे आजार उद्भवतात.
पांढऱ्या मिठाऐवजी जर आपण काळ्या मिठाचे सेवन केले तर आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरते.
काळ्या मिठामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. पोटाच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काळ्या मिठाचा वापर करू शकता.
काळ्या मिठामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते.
जर तुमच्या छातीत जळजळ होत असेल तर, काळ्या मीठाचे सेवन करु शकता.
अनेकांना रात्रभर झोप येत नाही. झोपेच्या समस्येवर मात करायची असेल तर काळ्या मिठाचे पाणी प्यावे.
केसगळतीमुळे प्रत्येकजण त्रासलेला असतो. काळ्या मीठाचे सेवन केल्यामुळे तुमच्या केसांच्या समस्या दूर होऊ शकतात.
हा लेख फक्त माहितीसाठी आहे. यामध्ये देण्यात आलेली माहिती सामान्य आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.