Chetan Bodke
चांगली आणि भरपूर झोप घेणं आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे. डॉक्टरही रूग्णांना पुरेशी झोप घेण्याचा कायमच सल्ला देतात.
८ तासांपेक्षा जर तुम्ही कमी झोप घेत असाल तर ही सवयी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
पुरेशी झोप न मिळाल्यामुळे व्यक्तीच्या हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे वेळेत झोपले पाहिजे असं तज्ज्ञ सांगतात.
रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या जाणवू शकते. उच्च रक्तदाबामुळे हृदय बंद पडण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.
झोप अपूरी झाल्यामुळे हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.
रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यामुळे डायबिटीजसारख्या आजाराला आमंत्रण मिळते.
पुरेशी झोप न मिळाल्यामुळे शरीरातील CRP प्रोटीन वाढते. त्यामुळे तणाव जास्त येऊ शकतो, त्यासोबतच हृदय विकाराचा झटका येण्याचीही शक्यता जास्त असते.
पुरेशी झोप न मिळाल्यामुळे व्यक्तीमध्ये नैराश्याची लक्षणं दिसू लागतात.
झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.