Vrishchik Rashi 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Vrishchik Rashi 2024 : प्रेमसंबधात येईल अडचण, पैशांची भासेल चणचण; कसे असेल वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष, वाचा एका क्लिकवर

कोमल दामुद्रे

Scorpio Rashibhavishya In Marathi 2024 :

राशीचक्रातील आठवी रास वृश्चिक. या राशीचा अधिपती हा मंगळ असून धन, ऐश्वर्य आणि आत्मशक्ती वाढवण्यास मदत करतो.

२०२४ च्या या वर्षात वृश्चिक राशीसाठी हे वर्ष ठिक ठाक असणार आहे. सुरुवातीला बुध, मंगळ आणि शुक्र हे ग्रह वृश्चिक राशीत असल्याने त्रिग्रही योग तयार झाला आहे. यासोबतच गुरु सहाव्या भावात असल्यामुळे शनी चतुर्थ भावात राहाणार आहे. त्यामुळे अनेक गोष्टी आयुष्यात घडतील. जाणून घेऊया कसे असेल वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष.

२०२४ मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना अनेक चढ- उतारांचा सामना करावा लागणार आहे. उत्पन्नापेक्षा जास्त खर्चाची तयारी ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परंतु, हे वर्ष त्रासदायक ठरु शकते. सप्टेंबर महिन्यानंतर अचानक आर्थिक (Money) धनलाभ होतील. उधार कुणालाही देऊ नका.

करिअरच्या (Career) दृष्टीने हे वर्ष अधिक परिश्रमाचे असणार आहे. पुढे जाण्यासाठी अनेक नव्या संधी मिळतील. आळस हा तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. नवीन वर्षात नोकरीच्या अनेक नव्या संधी मिळतील. करिअरमध्ये उंचावर पोहोचण्यासाठी काही गोष्टींची काळजी (Care) घ्यावी लागेल.

कौटुंबिक वातावरण बिघडू शकते. लवकरच लग्न होण्याची शक्यता दिसून येत आहे. मुलांच्या बाबतीत चिंता वाढू शकते. आरोग्यावरही परिणाम होऊ शकतात. शिक्षणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

आरोग्याच्या बाबतीत वर्षाच्या सुरुवातीला काही किरकोळ आजारांनी ग्रस्त राहाल. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होईल. व्यायाम आणि आरोग्यदायी दिनचर्या पाळायला हवी. यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.

यंदाचे वर्ष प्रेमी जोडप्यांसाठी लाभदायक ठरणार नाही. नात्यात दूरावा येऊ शकतो. प्रेमसंबंधात जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. नात्यांमध्ये वाद होणार नाही याची काळजी घ्या. नातेसंबंध मजबूत ठेवा.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT