ज्योतिषशास्त्रामुसार ज्या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर हे र, रा, रु,रे किंवा त, ता, ती पासून सुरु होते त्यांची राशी ही तुळ असते. ही राशीचक्रातील सातवी राशी असून शुक्र ग्रह हा त्याचा स्वामी मानला जातो.
नवीन वर्षाची चाहूल लागताच अनेकांना वर्ष कसे जाईल हा प्रश्न पडतो. परंतु, यावर्षी तुळा राशीचे नशिब फळफळणार आहे. तसेच आर्थिक (Money) यशासोबत (Success) करिअरमध्ये देखील उन्नती मिळेल. वर्षाच्या सुरुवातीला ग्रहांची स्थिती पाहिली तर सूर्य आणि मंगळ हे तिसऱ्या स्थानी असल्यामुळे शौर्याचे घर असल्यामुळे भौमादित्य योग तयार होईल. जाणून घेऊया कसे असेल तुळ राशीसाठी नवीन वर्ष. (Libra Rashi Yearly Horoscope 2024 In Marathi)
आर्थिकतेच्या दृष्टीने पाहायला गेले तर नवीन वर्ष हे सकारात्मक परिणाम देईल. संपत्तीत वाढ होण्यासोबतच उत्पन्नांत देखील वाढ होणार आहे. व्यवसायात (Business) विस्तार होण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. व्यवसायात वाढ होऊ शकते.
आरोग्याच्या बाबातीत यंदाचे वर्ष हे अधिक सकारात्मक असेल. मानसिक स्थितीतील अडथळे दूर होतील. कौटुंबिक कामात मन प्रसन्न राहिल. मानसिक स्थिती सुधारेल. आरोग्यपूर्वी पेक्षा खूप चांगले राहिल. सकारात्मक वृत्तीमुळे कामे होतील. जुने आजार कमी होतील, परंतु, दुखापत होण्याची शक्यता आहे.
नोकरी व्यवसायात प्रगती आणि बदल होण्याची शक्यता आहे. सामाजिक वर्तुळात वाढ होईल. प्रगतीचा काळ असेल. इलेक्ट्रॉनिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठीही हा काळ अनुकूल असेल. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. कुटुंब व मित्र परिवाराकडून सहवास लाभेल.
विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अभ्यासाच्या दृष्टीने सकारात्मक असेल. अभ्यास प्रगती होईल. पदवीसाठी हा काळ अनुकूल असेल. नोकरीत प्रगती आणि बदलाची परिस्थिती निर्माण होईल. लवकरच नवीन नोकरीच्या संधी मिळतील. तसेच वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष सकारात्मक राहाणार आहे. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. जीवनसाथीकडून सहाकार्य मिळेल. जोडीदाराच्या कार्यातून उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. प्रेमसंबंध सुधारतील. नवीन प्रेमसंबंध सुरु होतील. घर आणि वाहन सुखसोयीमध्ये वाढ होईल. घर आणि वाहनाच्या सुखसोयींसाचा लाभ होण्याची स्थिती आहे.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.