Kark Rashi 2024 : नवीन वर्षात कर्क राशीवर शनी देवाची छाया, आर्थिक स्थिती डगमगेल; प्रेमात येईल दूरावा

Cancer Horoscope 2024 : कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे नवीन वर्ष चढ-उताराचे असणार आहे. शनि आपल्या मूळ राशी कुंभ राशीत प्रवेश करत असल्यामुळे शुभ आणि अशुभ परिणाम मिळतील.
Kark Rashi 2024
Kark Rashi 2024Saam Tv
Published On

Kark Rashibhavishya In Marathi 2024 :

कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे नवीन वर्ष चढ-उताराचे असणार आहे. शनि आपल्या मूळ राशी कुंभ राशीत प्रवेश करत असल्यामुळे शुभ आणि अशुभ परिणाम मिळतील.

या राशीच्या लोकांना यश आणि नोकरीत लाभ मिळेल. बुध आणि शुक्र एकत्र असल्यामुळे राहू आणि केतूवर परिणाम होईल. ज्याचा प्रभाव कर्क राशीवर होणार आहे. जाणून घेऊया कसे असेल कर्क राशीसाठी नवीन वर्ष. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागच्या वर्षाच्या तुलनेत नवीन वर्षात आरोग्य (Health) चांगले राहिल. यकृताची समस्या उद्भवू शकते. बीपी आणि श्वसनाच्या रुग्णांना काही प्रमाणात काळजी (Care) घ्यावी. त्वचा आणि कफचे विकार होऊ शकतात. (Yearly Horoscope 2024 In Marathi)

Kark Rashi 2024
Mesh Rashi 2024 : नवीन वर्षात खुशखबरचा पाऊस! धन-दौलत वाढण्याची शक्यता, पदोन्नतीही मिळेल

प्रेमात यश मिळेल. यावर्षी लग्न जमण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहिल. नात्यातील तणावामुळे (Stress) दूरावा सहन करावा लागेल. कुटुंबात (Family) आनंदाचे वातावरण राहिल. अतिसंवेदनशीलतेमुळे नुकसान होऊ शकते.

आर्थिक स्थितीत चणचण जाणवेल. अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे. एप्रिलनंतर परिस्थिती सुधारेल. वर्षाच्या शेवटची जमिन किंवा मालमत्ता खरेदी करु शकता. गुंतवणूक कराल. वाहन खरेदी करण्याचा योग देखील आहे. नोकरीच्या नव्या संधी मिळतील. करिअर क्षेत्रात मोठे बदल होतील. (Yearly Astrology 2024 In Marathi)

Kark Rashi 2024
Mithun Rashi 2024 : मिथुन राशीच्या लोकांना करावा लागेल अडचणींचा सामना, नवीन वर्षात आयुष्यात होतील मोठे बदल; मेहनतीचे फळही मिळेल

लांबचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. प्रवासात दगदग होईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील. मानसिक तणाव जाणवेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. गुंतवणूक करताना विचार कराल. नुकसानही सहन करावे लागेल. स्पर्धा परीक्षांसाठी वर्ष खूप चांगले राहील. षष्ठ स्थानावर गुरु आणि शनीच्या एकत्रित प्रभावामुळे स्पर्धात्मक उमेदवारांना परीक्षेत यश मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com