Prasadacha sheera Saam TV
लाईफस्टाईल

Prasadacha sheera : गणेश चतुर्थीच्या सत्यनारायण पुजेला असा बनवा खमंग शिरा; सर्वत्र होईल तुमच्या रेसिपीचं कौतुक

Satyanarayan Pooja Sheera Recipe : सत्यनारायनाच्या पुजेसाठी प्रसादामध्ये गोड शिरा बनवला जातो. हा शिरा घरच्याघरी कसा बनवायचा याची रेसिपी आज पाहणार आहोत.

Ruchika Jadhav

गणेशोत्सवानिमित्त राज्यभर उत्सवाचं वातावरण पसरलं आहे. उद्या गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी या दोन्ही दिवशी अनेक व्यक्तींच्या घरी सत्यनारायणाची पुजा असते. सत्यनारायणाची पुजा म्हटलं की, प्रत्येकाला प्रसादाच्या शिऱ्याची आठवण येते.

प्रसाचा शिरा इतका चविष्ट असतो की तो फक्त ठरावी आचाऱ्यांनाच बनवता येतो. त्यामुळे या दिवशी घरी अनेक व्यक्ती आचारी सुद्धा बोलवतात. आता तुम्ही सुद्धा घरी आचारी बोलवून शिरा बनवून घेत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी प्रसादाच्या परफोक्ट शिऱ्याची रेसिपी शोधली आहे. हा शिरा खाल्ल्यानंतर प्रत्येक व्यक्ती शिरा बनवणाऱ्या व्यक्तीचं कौतुक करतील.

साहित्य

रवा - २ कप

साखर - २ कप

तूप - ३ कप

दूध - ५ कप

केळी - १ फळ

ड्रायफ्रूट्स

वेलची

जायफळ

कृती

शिरा बनवताना सर्वात आधी ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घ्या. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडं तूप घ्या. तूपात ड्रायफ्रूट्स छान फ्राय करून घ्या. त्यानंतर या पॅनमध्ये आणखी तूप घ्या आणि रवा मिक्स करा. रवा तुपात छान भाजून घ्या. रवा भाजताना तो जळणार नाही आणि कच्चा देखील राहणार नाही याची काळजी घ्या.

त्यासाठी गॅसची फ्लेम लो ठेवा. रवा छान भाजून झाल्यावर दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्या. त्यानंतर यामध्ये दूध गरम करून घ्या. गरम दुधात साखर मिक्स करा. त्यानंतर यामध्ये रवा जेखील अॅड करा. रवा मिक्स केल्यानंतर त्यात जायफळ आणि वेलची पूड मिक्स करा. शिरा दुधात छान शिजवून घ्या.

दूध कमी पडत असल्यास तुम्ही यात पाणी सुद्धा मिक्स करू शकता. रवा आर्धा शिजल्यावर यामध्ये एक केळी कुसकरून मिक्स करा. केळी मिक्स केल्यावर शिऱ्याला पुन्हा एक वाफ येऊद्या. त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स मिक्स करा. अशा पद्धतीने तुम्ही खमंग साजुक तुपातील शिरा बनवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT