Sanitary Pads Prolonged Use saam tv
लाईफस्टाईल

Sanitary Pads Prolonged Use: दीर्घकाळ सॅनिटरी नॅपकीन वापरल्याने कॅन्सर होतो? पाहा तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Cancer Risk from Sanitary Pads: सॅनिटरी नॅपकिन हे मासिक पाळीच्या काळात महिलांसाठी एक अत्यावश्यक उत्पादन आहे. मात्र या उत्पादनाचा अयोग्य आणि दीर्घकाळ केलेला वापर, तसंच पॅडमध्ये वापरली जाणारी रसायनं आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

महिलांमध्ये मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅडचा वापर केला जातो. स्वच्छता आणि कम्फर्ट टिकवण्यासाठी हे पॅड्स उपयुक्त मानले जातात. मात्र अजूनही अनेक महिलांच्या मनात प्रश्न आहे की, सॅनिटरी पॅड्स दीर्घकाळ वापरल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतो का? ज्यावेळी महिला ऑफिससाठी किंवा इतर कामासाठी बाहेर पडतात तेव्हा हा प्रश्न प्रामुख्याने समोर येतो.

सॅनिटरी पॅड्समुळे कॅन्सर होऊ शकतो का?

काही मेडिकल आणि मीडिया अहवालांनुसार, भारतात विकल्या जाणाऱ्या काही प्रसिद्ध ब्रँड्सचे सॅनिटरी नॅपकिन्स कॅन्सरचं कारण ठरू शकतात. या अहवालांमध्ये सांगण्यात आलंय की, हे पॅड्स पूर्णपणे सूती नसून त्यामध्ये सेल्युलोज जेल वापरण्यात येतं. याशिवाय डायॉक्सिन नावाच्या एका रसायनाचाही यामध्ये समावेश असतो. ज्यामुळे ओव्हेरियन कॅन्सरचा धोका वाढतो.

संधोशनातून काय आलं समोर?

२०२२ मध्ये दिल्लीतील पर्यावरण संस्था टॉक्सिक्स लिंकने यावर संशोधन केले. त्यांनी १० ब्रँड्सच्या सॅनिटरी नॅपकिन्सचं सर्व्हेक्षण केलं. यावेळी त्यांना असं आढळून आलं की, त्यामध्ये फ्थैलेट्स, VOCs, डायॉक्सिन्स, फिनॉल्स आणि पॅराबेन्स यांसारख्या धोकादायक रसायनांचे अंश होते. यामुळे त्वचा विकार, हार्मोनल असंतुलन, प्रजनन समस्या आणि कॅन्सर यासारख्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात.

तज्ज्ञांचं मत काय आहे?

टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबईचे डॉ. के. वेंकटेश चौधरी सांगतात की, फ्थॅलेट्स आणि इतर रसायनं आपल्या एंडोक्राइन सिस्टमवर परिणाम करतात म्हणजेच हार्मोनचं संतुलन बिघडू लागतं. याचा थेट परिणाम अंडाणूच्या कार्यक्षमतेवर होतो आणि दीर्घकालीन वापरामुळे प्रजनन क्षमता कमी होऊ शकते. ते पुढे सांगतात की, VOC चा दीर्घकाळ वापर केल्यास कॅन्सरचा धोका वाढतो.

सॅनिटरी पॅड वापरण्याचे योग्य मार्ग

  • दर ४–६ तासांनी पॅड बदलावा जरी रक्तस्राव कमी असला तरीही

  • हात स्वच्छ ठेवणं अत्यावश्यक आहे, पॅड बदलण्यापूर्वी आणि नंतर हात धुवा

  • कॉटन पॅड्स निवडा, यामुळे त्वचेची अ‍ॅलर्जी कमी होते

  • अतिशय स्वस्त किंवा बनावट पॅड्स टाळा, यात हानिकारक रसायनं असू शकतात

  • रात्री झोपताना देखील पॅड बदलावं, एकाच पॅडचा दीर्घकाळ वापर टाळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT