Surabhi Jayashree Jagdish
जर बोटांच्या टोकांवर सूज, नखे खाली वाकलेली, नखांच्या मुळाशी कोन वाढलेला, उष्णता जाणवणे किंवा नखे वेगळी दिसली तर हे नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सरचे लक्षण असू शकते.
जर मनगट आणि घोट्यांमध्ये सूज व वेदना असतील तर हे hypertrophic pulmonary osteoarthropathy चे लक्षण असू शकतं. जे फुफ्फुसाच्या कॅन्सरशी संबंधित एक दुर्मिळ पण महत्त्वाचा सिंड्रोम आहे.
हाताच्या हाडांमध्ये हालचालींमुळे वेदना जाणवत असतील, तर हे HPOA मुळे होणाऱ्या periostitis चं लक्षण असू शकतं.
जर एका पायात अचानक सूज, उष्णता आणि वेदना जाणवत असतील, तर हे डीप वेन थ्रॉम्बोसिस (DVT) चे लक्षण असू शकते. फुफ्फुसाचा कॅन्सर रक्ताच्या गाठींचा धोका वाढवतो.
बोटांवर गॉट्रॉन पॅप्युल्स, लालसर चट्टे, डोळ्याभोवती जांभळसर रंग, आणि हातावर किंवा हाताच्या भागावर सूर्यप्रकाशामुळे होणारे पुरळ दिसल्यास, ही कॅन्सरच्या आधी दिसणारी लक्षणं असू शकतात.
जर तुम्हाला मधुमेह किंवा बी-१२ कमतरता नसतानाही हात-पाय सुन्न होणं किंवा जळजळ जाणवत असेल तर हे स्मॉल सेल लंग कॅन्सरशी संबंधित परानेओप्लास्टिक न्यूरोलॉजिकल सिंड्रोम असू शकतो.
जर तुम्हाला जिना चढताना, खुर्चीतून उठताना किंवा हात वर करताना त्रास होत असेल तर हे डर्माटोमायोसायटिस किंवा पॉलिमायोसायटिस या परानेओप्लास्टिक आजारांचं लक्षण असू शकतं