Lung cancer symptoms: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये शरीरात होऊ लागतात 'हे' मोठे बदल; इतर अवयवांमध्येही पसरण्याचा धोका

Stage 4 lung cancer major body changes: लंग कॅन्सरच्या जेव्हा रूग्ण सर्वात प्रगत टप्प्यावर म्हणजे स्टेज ४ (Stage 4) वर पोहोचतो तेव्हा तो शरीरातील दूरच्या अवयवांमध्ये पसरतो. याला वैद्यकीय भाषेत मेटास्टेसिस (Metastasis) म्हणतात. यामुळे रुग्णाच्या शरीरात मोठे आणि गंभीर बदल दिसून येतात.
Lung cancer symptoms
Lung cancer symptomsSAAM TV
Published On
Summary
  • लंग कॅन्सरची स्टेज ४ हा घातक टप्पा मानला जातो

  • मेंदू, हाडं, यकृत यांच्यामध्ये फुफ्फुसांचा कॅन्सर पसरतो

  • सतत खोकला, थुंकीत रक्त आणि श्वास घेण्यास त्रास होणं याची लक्षणं आहेत

आजकाल संपूर्ण जगभरात कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये विविध कारणांमुळे होणाऱ्या फुप्फुसांच्या कॅन्सरची प्रकरणंही अधिक प्रमाणात समोर येतायत. फुफ्फुसांच्या कॅन्सर हा चौथ्या स्टेजमध्ये घातक मानला जातो. स्टेज ४ फुफ्फुसांचा कॅन्सर (Metastatic Lung Cancer) हा या आजाराचा सर्वात गंभीर आणि जीवघेणा टप्पा मानला जातो.

या स्टेजमध्ये कॅन्सर फक्त फुफ्फुसांसाठी मर्यादित राहत नाही तर रक्तप्रवाह किंवा लिम्फॅटिक सिस्टीमद्वारे शरीराच्या इतर महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पसरतो. यामध्ये मेंदू, हाडं, यकृत किंवा ॲड्रिनल ग्रंथी यांचा समावेश होतो. या अवयवांमध्ये कॅन्सर पसरल्यामुळे गंभीर गुंतागुंती निर्माण होतात. त्याचप्रमाणे शरीराच्या टिश्यूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Lung cancer symptoms
Heart artery blockage signs: हार्ट वेन्स ब्लॉक झाल्यास शरीरात दिसतात 'हे' बदल; चुकूनही या रेड फ्लॅग्सकडे दुर्लक्ष करू नका

हा फुफ्फुसाच्या कॅन्सरचा शेवटचा टप्पा मानला जातो. यामध्ये रुग्णांची शारीरिक स्थिती लवकर ढासळू लागते. यामध्ये लक्षणं अचानक दिसू लागतात किंवा आधी असलेली लक्षणं अतिशय वेगाने वाढू शकतात. यामध्ये सततटा खोकला, छातीत होणाऱ्या वेदना, तीव्र थकवा आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणं विशेष करून दिसून येतात.

लंग कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये कोणती प्रमुख लक्षणं दिसून येतात ती पाहूयात.

सतत खोकला आणि थुंकीत रक्त येणे

जर तुम्हाला सतत खोकला असेल आणि तो हळूबळू वाढत असेल तर हे लंग कॅन्सरच्या चौथ्या स्टेजचं प्रमुख लक्षणं आहे. यामध्ये खोकल्यासोबत थुंकीत रक्त दिसू शकतं. हे ट्यूमरमुळे श्वसनमार्गातील जळजळ किंवा रक्तस्त्रावामुळे होण्याचा धोका असतो. हा खोकला इतका असतो की तुमची दररोजची कामं आणि झोपेवर याचा परिणाम होतो.

श्वास घेण्यास त्रास होणं

लंग कॅन्सर असल्यास त्याचा ट्यूमर मोठा झाल्याने तो श्वसनमार्गात अडथळा आणतो. यामुळे फुफ्फुसांभोवती द्रव साचू शकतं. अशावेळी छोटी कामं किंवा हालचालींनंतरही श्वास घ्यायला त्रास होतो. हळूहळू हा त्रास वाढू लागतो.

Lung cancer symptoms
Early symptoms of Heart blockage: हृदयाच्या नसांमध्ये प्लाक जमल्यावर शरीरात होतात हे बदल; हार्ट ब्लॉकेज होण्यापूर्वी व्हा सावध

छातीत वेदना

लंग कॅन्सरचा ट्यूमर हा अनेकदा छातीच्या भिंतीवर, नसांवर किंवा आसपासच्या टिशूंवर दाब देतो. यामुळे छातीत तीक्ष्ण वेदना होऊ शकतात. खोकताना, हसताना किंवा खोल श्वास घेताना या वेदना रूग्णाला जास्त वाटू शकतात.

थकवा आणि अशक्तपणा

कॅन्सर कोणताही असो तो शेवटच्या टप्प्यात आला की रूग्णाला अतिरीक्त प्रमाणात थकवा जाणवू लागतो. लंग कॅन्सरच्या स्टेज ४ मध्ये अतिशय तीव्र थकवा जाणवू शकतो. मुख्य म्हणजे रूग्णाने कितीही विश्रांती घेतली तरीही तो थकवा कमी होत नाही. शरीरावर कॅन्सरचा ताण, रक्तातील ऑक्सिजन कमी होणं आणि शरीरातील ऊर्जा जास्त प्रमाणात खर्च होणं यामुळे हा थकवा निर्माण होतो.

आवाज बसणं किंवा आवाजात बदल

कॅन्सर जर स्वरयंत्राशी जोडलेल्या नसांवर परिणाम करत असेल, तर रुग्णाचा आवाज बसतो किंवा बदलतो. जर हा बदल सतत राहात असेल आणि सोबत फुफ्फुसांशी संबंधित इतर लक्षणंही असू शकतात.

Lung cancer symptoms
Foods to clean heart vessels: 'या' पद्धतींनी लगेच वितळेल धमन्यांमध्ये जमा झालेली चरबी; हृदयाच्या रक्तवाहिन्या होतील एकदम स्वच्छ

कॅन्सर शरीराच्या इतर अवयवांमध्ये पसरल्यावर दिसणारी लक्षणं

मेंदूमध्ये पसरणे (Brain Metastasis)

फुफ्फुसांचा कॅन्सर हा मेंदूपर्यंत पोहोचण्याचा धोका अधिक असतो. फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये मेंदू हा सर्वाधिक प्रभावित होणारा अवयव आहे. Therapeutic Advances in Medical Oncology या अभ्यासानुसार, मेंदूतील कॅन्सर पसरल्यावर खालील लक्षणं दिसतात-

  • सतत डोकेदुखी

  • फिट्स

  • चक्कर येणं

  • स्मृती जाणं

  • वर्तन किंवा बोलण्यात बदल होणं

या अवस्थेत रुग्णाचे आयुष्य सामान्यतः एका वर्षापेक्षा कमी असू शकतं.

हाडांमध्ये पसरणं (Bone Metastasis)

३०–४०% रुग्णांमध्ये फुफ्फुसांचा कॅन्सर हा हाडांपर्यंत पसरतो. यामध्ये खास करून पाठीचा कणा, बरगड्या आणि मांडीच्या हाडात (femur) पसरण्याचा धोका अधिक असतो. यामध्ये तीव्र वेदना (८०% रुग्णांना), हाडं कमकुवत होऊन फ्रॅक्चर होणं ही लक्षणं दिसून येतात.

यकृतात पसरणं (Liver Metastasis)

Medical Oncology च्या अभ्यासानुसार, कॅन्सर लिव्हरमध्ये गेल्यास-

  • पोटदुखी

  • कावीळ

  • लिव्हर सुजणं

लवकर निदान झाल्यास केमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपीद्वारे परिणाम सुधारता येतो.

Lung cancer symptoms
Heart Attack: हार्ट अटॅक येण्याच्या २ दिवसांपूर्वी दिसतात 'ही' लक्षणं; वेळीच व्हा सतर्क
Q

स्टेज ४ फुफ्फुस कॅन्सर म्हणजे काय?

A

कॅन्सर इतर अवयवांमध्ये पसरलेला असतो.

Q

फुफ्फुस कॅन्सरची प्रमुख लक्षणे कोणती?

A

खोकला, थुंकीत रक्त आणि श्वास त्रास होतो.

Q

मेंदूत कॅन्सर पसरल्यास काय होते?

A

डोकेदुखी, चक्कर आणि स्मृतिभ्रंश होतो.

Q

हाडांमध्ये कॅन्सर पसरल्याची लक्षणे काय?

A

तीव्र वेदना आणि हाडे कमकुवत होतात.

Q

लवकर निदानाचा फायदा काय आहे?

A

केमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी प्रभावी होते.

Lung cancer symptoms
Symptoms of heart attack in kids: लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' 5 लक्षणं; पालकांनी दुर्लक्ष करू नये

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com