Aging Problem  Saam Tv
लाईफस्टाईल

Aging Problem : वाढत्या वयात चंदन आहे संजीवनी; तुमच्या ब्युटी रुटीनचा बनवा हिस्सा, काळवंडलेल्या त्वचेपासून होईल सुटका

Amazing Benefits of Sandalwood For Skin : आपण कितीही महागातले उत्पादने वापरले तरी चेहऱ्यावर येणारे डाग काही थांबत नाही.

कोमल दामुद्रे

Skin Care Tips : वय वाढले की, चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. अशावेळी आपण कितीही महागातले उत्पादने वापरले तरी चेहऱ्यावर येणारे डाग काही थांबत नाही. वाढत्या वयावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो चेहऱ्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल क्रीम वापरतो पण तरी देखील त्वचा ही निस्तेज दिसू लागते.

त्यामुळे आपल्याला ताण (Tension) येऊ लागतो. जर आपण महागड्या उत्पादनाऐवजी आयुर्वेदिक चंदनाचा वापर केला तर काही दिवसात आपल्याला रिजल्ट मिळेल. त्वचा तजेलदारही दिसेल व चेहऱ्यावरचे (Skin) डागही कमी होतील.

सौंदर्य वाढवण्यासाठी चंदनाचा वापर पूर्वीपासून केला जात आहे. अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडेंट, अँटीमाइक्रोबियल, अँटी-एजिंग, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल घटकांनी समृद्ध असलेले चंदन (Sandalwood) आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

चंदनाचे फायदे (Benefits)

1. वृध्दत्व थांबवण्यासाठी

चंदनामध्ये अँटिऑक्सिडंट्स आहे. जे त्वचेच्या पेशी निरोगी राखण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे वृद्धत्व कमी होऊ शकते. याशिवाय ते त्वचेला हायड्रेट ठेवते ज्यामुळे कोरडेपणाची समस्या उद्भवत नाही. याव्यतिरिक्त, ते त्वचेची लवचिकता देखील राखण्यास मदत करते.

2. स्पॉट्स

चंदनाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील डागही कमी करता येतात. चंदनामध्ये मध मिसळून चेहऱ्यावर, हातापायावर लावल्यास हट्टी डागही दूर होतात.

3. त्वचा ग्लो होईल

चेहऱ्याची चमक टिकवून ठेवण्यासाठी चंदनाचा वापर खूप प्रभावी आहे. उन्हात सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे चेहरा काळा पडतो. अशावेळी चंदनाचे फेसपॅक उपयोगी ठरते.

4. मुरुमांपासून सुटका

आयुर्वेदानुसार चंदन हे थंड आहे. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेला खाज सुटल्यास किंवा मुरुमे आल्यास अशावेळी चंदन फायदेशीर आहे. याच्या वापराने पिंपल्स, रॅशेस आणि यासारख्या समस्यांमध्ये त्वरित आराम मिळतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

SCROLL FOR NEXT