सॅमसंग या नावाजलेल्या मोबाइल कंपनीने नुकतीच गॅलॅक्सी S24 अल्ट्रा आणि गॅलॅक्सी S24 या एंटरप्राइज एडिशन लाँचची घोषणा केली आहे. अँड्रॉईड युजर्सच्या पसंतीस उतरणारी सर्व लाइव्ह ट्रान्सलेट, इंटरप्रीटर, नोट असिस्ट आणि सर्कल टू सर्च विथ गुगल गॅलॅक्सी एआय वैशिष्ट्ये असलेले हे दोन्ही सुधारित दीर्घकालीन सपोर्टसह हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. प्रबळ एंटरप्राइज एक्सक्लुसिव्ह सॅमसंग एक्सकव्हर 7 स्मार्टफोनच्या यशस्वी लाँचनंतर फ्लॅगशिप एंटरप्राइज एडिशन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आला आहे.
एंटरप्राइज एडिशन गॅलॅक्सी S24 मध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजची क्षमता असून गॅलॅक्सी S24 अल्ट्रामध्ये १२ जीबी रॅम तसंच २५६ जीबी स्टोरेज क्षमता आहे. दोन्ही डिव्हाईस पॅच मॅनेजमेंट, स्थिर डिवाईस उपलब्धता आणि सतत ओएस व्हर्जन अपडेट्ससह विनासायास परफॉर्मन्सची खात्री देणारे असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
गॅलॅक्सी S24 आणि गॅलॅक्सी S24 अल्ट्रा हे दोन्ही मोबाईल फोन ग्राहकांना Samsung.com आणि www.samsung.com/in/corporateplus या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत. डिवाईसच्या ३ वर्षांच्या वॉरंटीचा कलावधी जागतिक स्तरावर २०२४ मध्ये लाँच करण्यात आलेल्या सर्व एंटरप्राइज एडिशन डिवाईसेससाठी एप्रिल २०२४ पासून असेल आणि त्यानंतर फक्त S24 (ओनिक्स ब्लॅक, ८/२५६ जीबी) आणि S24 अल्ट्रा (टायटॅनियम ब्लॅक, १२/२५६ जीबी) साठी लागू आहे. बॅटरी स्टॅण्डर्ड वॉरंटी १२ महिने असून अॅक्सेसरीजसाठी ६ महिन्यांची वॉरंटी आहे. यात अॅक्टिवेशन तारखेपासून विनामूल्य १-वर्ष नॉक्स सूट ग्राहकांना मिळवता येणार आहे. १ वर्षानंतर प्लॅननुसार सबस्क्रिप्शन शुल्क लागू होतील. तर, गॅलॅक्सी S24 आणि गॅलॅक्सी S24 अल्ट्रा या दोन्ही मोबाईल फोनची किंमत ७८ हजार ९९९ रूपयांपासून सुरू होत आहे.
एंटरप्राइज एडिशन गॅलॅक्सी S24 अल्ट्रा आणि गॅलॅक्सी S24 रिअल-टाइम आवाज व मजूकराच्या भाषांतरासाठी लाइव्ह ट्रान्सलेट व इंटरप्रीटर अशा वैशिष्ट्यांसह कम्युनिकेशनमध्ये वाढ करतात. चॅट असिस्ट संवादात्मक टोन्स सुधारते, तर नोट असिस्ट सॅमसंग नोट्समध्ये सारांश व टेम्पलेट्स तयार करते. ट्रान्सक्रिप्ट असिस्ट वॉईस रेकॉर्डिंग्जचे लिप्यंतरण व भाषांतरासाठी एआय आणि स्पीच-टू-टेक्स्ट तंत्रज्ञानाचा वापर करते.
सॅमसंग एंटरप्राइज एडिशनमध्ये व्यवसायांसाठी अधिक सुरक्षितता आहे, जेथे ग्राहकांना जवळपास ७ वर्षांचे सतत फर्मवेअर अपडेट्स मिळतात. यामधून त्यांचे मोबाइल डिवाईसेस आधुनिक अँड्रॉइड व सॅमसंग सिक्युरिटी पॅचेससह अपडेटेड राहण्याची खात्री मिळते, ज्यामुळे मालवेअर, फिशिंग स्किम्स व सॉफ्टवेअर मालफंक्शन्स अशा मालिशियस जोखीमांपासून संरक्षण होते. सॅमसंग डिवाईसेसची क्षमता कायम राखत एंटरप्राइज एडिशन कंपन्यांना गोपनीयपणे आणि संभाव्य असुरक्षिततांपासून सुरक्षितपणे ऑपरेट करण्यास सक्षम करतात.
सॅमसंगचे एंटरप्राइज एडिशन गॅलॅक्सी S24 अल्ट्रा आणि गॅलॅक्सी S24 भारतातील झपाट्याने डिजिटाइज होत असलेल्या व्यवसाय वातावरणामध्ये विश्वसनीय, सुरक्षित व व्यवस्थापन करता येण्याजोग्या डिवाईसेससाठी वाढत्या मागणीची पूर्तता करतात. डेटा सुरक्षितता, दीर्घकालीन डिवाईस सपोर्ट आणि जलद अंमलबजावणीची खात्री देत हे डिवाईसेस एंटरप्राइजेजना सक्षम करतात आणि व्यवसाय प्रमुखांना त्यांच्या मोबाइल ताफ्यांबाबत उत्तम दृश्यमानता, नियंत्रण व आत्मविश्वास देतात. आमचा व्यसायांना तंत्रज्ञानाचा विनासायासपणे, सुरक्षितपणे व शाश्वतपणे फायदा घेण्यास, तसेच भारताच्या एंटरप्राइज व्यवसाय विकासाला चालना देण्यास सक्षम करण्याचा मनसुबा आहे.आकाश सक्सेना, उपाध्यक्ष, सॅमसंग इंडियाच्या एंटरप्राइज बिझनेस.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.