Tanvi Pol
एक बाऊलमध्ये १ कप मैदा, २ टेबलस्पून साखर, १ टीस्पून बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ मिसळा.
दीड कप दूध, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण तयार करा.
सर्व घोटून मऊ पिठासारखे बनवा.
नॉनस्टिक तव्यावर थोडं तेल घालून गरम करा.
छोट्या पुरीएवढं पीठ टाकून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी शेकून घ्या.
दोन्ही बाजूंनी हलकं ब्राऊन झालं की काढा.
एका बाजूला चॉकलेट स्प्रेड किंवा नटेला लावा आणि दुसरी बाजू ठेवून सँडविच करा मग तयार झाले डोरा केक