
मराठी भाषा न बोलणाऱ्या परप्रांतियांना मनसैनिक आपल्या स्टाईलमध्ये उत्तर देताना दिसत आहेत. मराठी बोलण्याच्या मद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या मारहाणीच्या निषेधार्थ मीरा-भाईंदरमध्ये गुरूवारी व्यापारी संघटनेने मोर्चा काढला होता. तसंच आंदोलन देखील केले होते. मनसे कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यात आला. या मोर्चाला भाजपने रसद पुरवल्याचा आरोप केला जात आहे. आता यावरच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक होत व्यापाऱ्यांना चांगलाच दम दिला.
मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेविरोधात मोर्चा काढल्यानंतर वातावरण चांगलंच तापले आहे. 'व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल.' असा थेट इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी परप्रांतीय व्यापाऱ्यांना दिला आहे. संदीप देशपांडे यांनी व्यापाऱ्यांना इशारा दिल्यानंतर आता त्यांच्यावर टीका केली जात आहे.
संदीप देशपांडे यांनी सांगितले की, 'काल भारतीय जनता पक्षाने 2-3 व्यापारी लोकांना घेऊन मोर्चा अरेंज करायचा प्रयत्न केला. त्या बेपारी लोकांना माझं सांगणं आहे, व्यापार करायाला आला आहात, तर व्यापार करा. आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. आमच्या मराठी भाषेचा अपमान केला तर कानाखाली पडेल.' तसंच, 'एकदा या बेपारी लोकांनी ठरवावं आयुष्यभर दुकानाच्या काचा बदलत रहायचं आहे की व्यापार करायचा आहे. हे त्यांनी ठरवावं आणि मग पुढची भूमिका घ्यावी.' असा देखील इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.
दरम्यान, मिरारोडमध्ये एका व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ व्यापारी संघटनांनी एकत्र येत शक्तीप्रदर्शन केले आणि मोर्चा काढला. मारहाण झालेल्या व्यापाऱ्यासोबत जे घडलं ते इतर कुणासोबत भविष्यात घडू शकते अशी चिंता या आंदोलक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली होती. अशा घटना होऊ नये यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात अशी मागणी व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.