Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Asia Cup Hockey : पाकिस्तानचा हॉकी संघ आशिया कप आणि ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप खेळण्यासाठी लवकरच भारतात दाखल होणार आहे. भारत सरकारकडून पाक संघाला भारतात येण्यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

पाकिस्तानचा हॉकी संघ लवकरच भारतात दाखल होणार आहे. भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयासह गृह आणि परराष्ट्र मंत्रालयानेही पाक संघाला भारतात येण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा आशिया कप आणि ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार आहे.ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सहभागाबाबत साशंकता होती. मात्र आता त्या सर्व अडथळ्यांवर मात करत भारत सरकारने अधिकृत परवानगी दिली आहे.

पाक संघ पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया कप हॉकी स्पर्धेत सहभागी होणार असून नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या ज्युनियर वर्ल्ड कपमध्येही त्यांचा सहभाग निश्चित करण्यात आला आहे.हा निर्णय क्रीडाप्रेमींसाठी आणि दोन्ही देशांतील क्रीडा संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. आता या दोन्ही स्पर्धांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com