samosa  saam tv
लाईफस्टाईल

Samosa: वेळीच व्हा सावधान! समोसा, जिलेबी धोकादायक, सिगारेटप्रमाणे हानिकारक

Samosas and Jalebis Harmful: समोसा आणि जलेबी खाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. समोसा आणि जलेबी हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. हे दोन्ही पदार्थ सिगारेटप्रमाणे हानिकारक असल्याची माहिती समोर आली आहे.

Girish Nikam

तुम्ही पण समोसा खाण्याचे शौकीन असाल तर सावधान. आता समोसा आणि जिलेबी हे तुमच्या आवडीचे पदार्थ सिगारेटएवढंच घातक असल्याची बाब समोर आलीय. याबाबत आरोग्य मंत्रालयाचे आदेश दिले आहेत. हे आदेश काय आहेत? आपण या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेऊया...

आता जेव्हा तुम्ही चहासोबत गरमागरम समोसे घ्यायला जालं किंवा दुकानातून जिलेबी विकत घ्याल आणि त्या पॅकेटवर 'आरोग्यासाठी हानिकारक' असं छापलेलं असेल तर. हो... हे प्रत्यक्षात येणार आहे..कारण सरकारच आता लोकांच्या आरोग्याविषयी सजग झालंय.. चरबीयुक्त पदार्थ, अतिरिक्त साखर आणि मीठ असलेल्या जंक फूडवर सिगारेटच्या पाकिटाप्रमाणेच आरोग्यविषयक इशारे लावण्याची तयारी करत आहे.

FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने एक प्रस्ताव तयार केला आहे. यानुसार समोसे, जिलेबी, बर्गर, बिस्किटे आणि थंड पेये यांसारख्या उत्पादनांवर इशारा देणारे लेबल आवश्यक आहे. या प्रस्तावात केवळ पॅकेजिंगवर इशारे देण्याची सूचना नाही तर टीव्ही आणि सोशल मीडियावरील जंक फूडच्या जाहिरातींवरही कडक सूचनांची गरज व्यक्त केली आहे.

म्हणजेच आता चवीनं खाल्लं जाणारं हे जंक फूड आरोग्यविषयक इशाऱ्यासह उपलब्ध असतील. कारण साखर आणि ट्रान्स फॅट्स हे तंबाखू सारखेच धोकादायक आहेत. म्हणूनच आरोग्य मंत्रालयाने एम्स नागपूरसह सर्व केंद्रीय संस्थांना खाद्यपदार्थांमध्ये तेल आणि साखरबाबत माहिती असलेले बोर्ड बसवण्याचे आदेश दिलेत.

आजकाल प्रत्येक दुसरा व्यक्ती लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयरोग यासारख्या समस्यांशी झुंजत आहे. प्रक्रिया केलेले अन्न आणि असंतुलित आहार हे या आजाराचं प्रमुख कारण आहे. भारतातील 10 कोटींहून अधिक लोक लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. 12% पुरुष आणि 40% महिला पोटाच्या चरबीने ग्रस्त आहेत.जगातील एकूण मधुमेह रुग्णांपैकी एक चतुर्थांश रुग्ण भारतात आहेत. 2050 पर्यंत भारत सर्वाधिक लठ्ठ लोकांचा दुसरा देश होण्याची भिती आहे. जंक फूड दररोज आणि मोठ्या प्रमाणात खाणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळेच समोसे आणि जिलेबीसारख्या खाद्यपदार्थांवरचा इशारा पाहिल्यानंतर यापुढे तरी तुम्ही खाण्याआधी नक्कीच दोनदा विचार कराल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

SCROLL FOR NEXT