
केरळमधील कन्नूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिथे १८ वर्षाच्या मुलीचा डाएटिंगमुळे मृत्यू झाला. ती आपल्या वजनाचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील डाएट प्लॅन फॉलो करत होती. वजन वाढण्याच्या भीतीने तिने आधीच जेवण सोडले होते. या डाएटिंगचा परिणाम म्हणून तिच्या जीवाचा बळी गेला.
कन्नूरमधील कुथुपरंबा येथील रहिवासी श्रीनंद यांचे थलासेरी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. उपचारादरम्यान ती व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. याआधी, त्यांच्यावर कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्येही उपचार झाले होते. नातेवाईकांच्या म्हणण्यांनुसार, श्रीनंदा वजन वाढण्याची भीती असल्याने नेहमी जेवण वगळत असे आणि अत्यधिक व्यायाम करत होती. ती द्रव आहारावर होती आणि उपासमारीच्या अवस्थेत होती, ज्यामुळे तिच्या शरीरावर गंभीर परिणाम झाला आणि अखेरीस तिचा मृत्यू झाला.
मृत मुलगी मत्तानूर पझहसिराजा एनएसएस कॉलेजमध्ये पदवीच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, तिच्या मृत्यूचे कारण एनोरेक्सिया नर्वोसा, खाण्याच्या विकाराशी संबंधित असू शकते. कोविडनंतरच्या काळात या प्रकारच्या विकारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, आणि सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अनेक विविध समस्यांचे समावेश होतो, जे वेळेवर लक्षात घेतले गेले नाहीत.
खाण्यापिण्याबाबतच्या चुकीच्या सवयींमुळे अनेक गंभीर प्रकरणे उघडकीस आली आहेत. चुकीटे डाएटिंग आणि शरीर वाढवण्यासाठी स्टिरॉइड्सचा वापर यामुळे अनेक जीव गमावले आहेत. यावर्षी एका १४ वर्षीय मुलाने सोशल मिडिया चॅलेंजमध्ये भाग घेताना अत्याधिक मसालेदार चिप्स खाल्ल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. चिप्समध्ये मोठ्या प्रमाणात मिरची मिसळली होती, आणि मुलाला जन्मजात हृदयरोग होता. या घटनेच्या शवविच्छेदन अहवालातून अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या. जरी हे प्रकरण अमेरिकेत घडले असले तरी भारतातही अशा प्रकारच्या घटनांची संख्या वाढलेली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.