Adulteration in Milk  Saam TV
लाईफस्टाईल

Adulteration in Milk : दूधात पाणी आहे का? FSSAI ने सांगितली भेसळ ओळखण्याची सिंपल ट्रीक

Pure Milk : नागरिक विविध कंपन्यांमधील पिशवीत मिळणारं दूध खरेदी करतात. हे दूध पूर्णत: शुद्ध आणि अजिबात पाणी नसलेलं आहे, असा दावा सुद्धा जाहिरातींमध्ये करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दूध आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे. दूधाचे सेवन केल्याने विविध आजारांवर मात करता येते. दूधात कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, व्हिटॅमीन ए आणि डी सुद्धा असतं. त्यामुळे दूध प्यायल्यावर आपल्या शरीरात ही सर्व पोषक द्रव्य जातात. त्यामुळे दररोज एक ग्लास तरी दूधाचे सेवन केले पाहिजे.

पूर्वी घरोघरी गाई आणि म्हशी असायच्या. त्यामुळे सर्वांना शुद्ध आणि ताजं दूध पिण्यासाठी मिळत होतं. मात्र आता शहरांमध्ये गाई किंवा म्हशी नाहीत. त्यामुळे येथील नागरिक विविध कंपन्यांमधील पिशवीत मिळणारं दूध खरेदी करतात. हे दूध पूर्णत: शुद्ध आणि अजिबात पाणी नसलेलं आहे, असा दावा सुद्धा जाहिरातींमध्ये करतात.

मात्र पिशवीत मिळणाऱ्या दूधात हमखास पाणी आढळतं. दूध अशी गोष्ट आहे ज्यात कितीही पाणी मिक्स केले तरी त्याचा रंग काही बदलत नाही. त्यामुळे आपल्याला कुणीही सहज फसवू शकतं. आता अशा फसवणुकीपासून स्वत: चा बचाव करण्यासाठी FSSAI ने एक ट्रीक शोधली आहे. त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओ बाबत आज जाणून घेणार आहोत.

FSSAI ने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, पाणी मिक्स असलेलं दूध ओळखण्यासाठी एक काचेचा तुकडा घ्या. त्यावर दूधाचे ५ थेंब एकाचवेळी टाका. हे दूध सावकाश आणि हळूहळू खाली सरकले तर समजा यात पाण्याची भेसळ नाही. मात्र दूध खाली पटकन गेले तर समजून जा की या दूधामध्ये जास्तप्रमाणात पाणी टाकण्यात आले आहे. घरच्याघरी या सिंपल ट्रीकने तुम्ही पाणी असलेलं दूध ओळखू शकता.

दूध पिण्याचे फायदे

दृष्टी सुधारते

दूधामध्ये असलेलं कॅल्शिअम आपल्या डोळ्यांसाठी महत्वाचं आहे. त्याचे सेवन नियमीत केल्याने ज्या व्यक्तींना डोळे दुखणे. अस्पष्ट आणि अंधुक दिसणे या समस्या होत नाहीत. त्यामुळे आहारात कायम दूधाचा समावेश करावा.

हाडे मजबूत होतात

दूध प्यायल्याने आपली हाडे मजबूत होतात. ज्या व्यक्तीला काही कारणामुळे फॅक्चर होते त्यांना देखील डॉक्टर दूध जास्त पिण्याचा सल्ला देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक संजय केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

SCROLL FOR NEXT