चपाती म्हटलं की अनेक महिलांना पीठ मळण्याचे तसेच चपात्या लाटण्याचे टेन्शन येते. यामध्ये महिलांचा जास्त वेळ निघून जातो. पीठ हाताने मळताना ते जास्त कडक किंवा जास्त पातळ होण्याची शक्यता वाढते आणि यामुळे चपातीही नीट होत नाही. महिलांच्या या समस्येवर रामबाण उपाय जाणून घ्या.
डोशासारखी चपाती बनवा
चपातीचे पीठ न मळता आणि चपाती न लाटता बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यात पाणी घालून पीठ पातळ करा. त्यात चवीनुसार मीठ घाला. तयार झालेले मिश्रण छान एकजीव करून घ्या. आता गॅसवर पॅन गरम करून गव्हाचे पातळ पीठ डोशाप्रमाणे पॅनवर सोडा आणि गोलाकार पसरवून घ्या. हे पीठ पसरवताना जास्त जाड किंवा बारीक होणार नाही याची काळजी घ्या. चपाती दोन्ही बाजूनी छान शेकून घ्या. आता ही चपाती हळूहळू फुगू लागेल. चपाती अजून छान फुगण्यासाठी कपड्यांने त्यावर दाबही द्या. अशा प्रकारे डोशानुसार तुम्ही चपती तयार करू शकता. तुमचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचेल. चपाती तयार झाल्यावर ती सुती कापडात ठेवून द्या. ही चपाती कापसासारखही नरम होईल. या सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही पीठ न मळता, न लाटता सुंदर झटपट चपाती तयार करू शकता.
गुणकारी चपाती
रोजच्या आहारातील चपाती शरीराला ऊर्जा देण्यासाठी खूप महत्वाची आहे. रोज दिवसातून ६-७ चपात्या खाव्या. चपातीमध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुरळीत करते. तसेच पोट दीर्घकाळ भरलेले राहते. रात्री चपाती खाल्ल्यावर आवर्जून शतपावली करावी.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.