Cooking Tips : चपात्यांचे वेडेवाकडे नकाशे पाहून त्रास होतोय? 'या' टिप्स फॉलो करा बनवा गोल,लुसलुशीत चपाती

Roti Making Tips : वारंवार प्रयत्न करूनही चपाती गोल होत नसेल तर 'या' टिप्स फॉलो करा. काही दिवसात तुम्हालासुद्धा गोल आणि लुसलुशीत चपाती बनवता येईल.
Roti Making Tips
Cooking TipsSAAM TV

खमंग, स्वादिष्ट जेवण बनवणे ही एक कला आहे. वेगवेगळे पदार्थ घरी ट्राय करायला अनेकांना आवडते. पण रोजच्या जेवणातील एक असा पदार्थ जो बनवताना लोकांच्या तोंडचे पाणी पळवलं. तो म्हणजे गोल,फुगलेल्या चपात्या बनवणे.भारतीय थाळी चपातीशिवाय अपूर्ण आहे.अनेक प्रयत्न करूनही काहींना गोल चपात्या बनवता येत नाहीत. त्यांचे वारंवार विविध देशांचे वेडेवाकडे नकाशे बनले जातात. तुम्हालाही गोल, लुसलुशीत चपाती करायची असेल तर'या' टिप्स फॉलो करा.

चपाती करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

 • मऊ लुसलुशीत गोल चपाती करण्यासाठी सराव खूप महत्वाचा आहे.

 • चपाती पोळपाटावर लाटताना मध्यभागी जाड राहणार नाही याची काळजी घ्या.

 • चपाती केव्हाही कडेकडेने लाटावी.

 • चपाती मऊ बनवण्यासाठी दही, तूप, बेकिंग सोडा याचा वापर तुम्ही करू शकता.

 • चपातीचे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करू नये. त्यामुळे चपात्या लाटताना त्रास होतो.

 • नेहमी पीठ मळल्यावर ओल्या सुती कापडात गुंडाळून ठेवावे. यामुळे चपात्या मऊ होतात.

 • कधीही चपाती लाटताना सुके पीठ मर्यादित प्रमाणात लावावे. पीठ जास्त लावल्यास चपात्या कडक होतात.

 • चपाती लाटताना जास्त बारीक किंवा जास्त जाड लाटू नये. त्याचा आकार मध्यम ठेवावा.

 • चपाती छान फुगण्यासाठी त्या भाजताना चारी बाजूने चपातीच्या कडा कापडाने दाबा.

Roti Making Tips
Tikhat Shevaya Recipe: नाश्त्याला झटपट बनवा तिखट शेवया; वाचा ५ मिनिटांत तयार होणारी सिंपल रेसिपी

२ सोप्या टिप्स

 • कितीही केले तरी चपात्या गोल होत नसतील तर वर सांगितल्याप्रमाणे चपाती लाटून त्यावर गोल झाकणाने आकार द्यावा. बाजूची अतिरिक्त कडा सुरीने कापून घ्या. ही साधी ट्रिक तुमची चपाती गोल करेल.

 • आजकालच्या धावपळीच्या जगात चपात्या बनवण्यासाठी एवढा वेळ घालवणे काहींना जमत नाही. तर यासाठी तुम्ही बाजारात सहज उपलब्ध असलेले रोटी मेकर खरेदी करू शकता. रोटी मेकरच्या साहाय्याने तुम्ही चपातीचे पीठ मळण्यापासून ते गरमागरम चपात्या गोल आकारासोबत बनवू शकता. हे रोटी मेकर वापरायला सोपे आणि कमी वेळ घेणारे आहे. चपाती बनवण्याच्या सर्व त्रासातून तुमची सुटका होईल.

Roti Making Tips
Moong and Matki Dosa : मूग आणि मटकीचा चटकदार डोसा कधी खाल्ल्याय का? वाचा पौष्टिक रेपिसी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com