Moong and Matki Dosa : मूग आणि मटकीचा चटकदार डोसा कधी खाल्ल्याय का? वाचा पौष्टिक रेपिसी

Sprouts Dosa Recipe : मूग आणि मटकी हे कडधान्य आपल्या आरोग्यासाठी फार चांगले असतात. आजवर तुम्ही मूग आणि मटकीची भाजी खाल्ली असेल. मात्र यापासून तयार होणारा डोसा कधी खाल्ला आहे का?
Sprouts Dosa Recipe
Moong and Matki DosaSaam TV
Published On

आहारात पौष्टिक पदार्थ असावेत असं डॉक्टरांकडून नेहमी सांगितलं जातं. मात्र जिभेचे चोचले पुरवण्यासाठी व्यक्ती विविध पदार्थ खातात आणि आजारी पडतात. मूग आणि मटकी हे कडधान्य आपल्या आरोग्यासाठी फार चांगले असतात. आजवर तुम्ही मूग आणि मटकीची भाजी खाल्ली असेल. मात्र यापासून तयार होणारा डोसा कधी खाल्ला आहे का?

Sprouts Dosa Recipe
Moong Daal Halwa Recipe : पचायला हलका व चविष्ट असा मुग डाळीचा हलवा !

बऱ्याच व्यक्तींना असा डोसा बनवला जातो हे माहिती देखील नसेल. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी झटपट तयार होणारी डोसा सिंपल आणि चटकदार रेसिपी आणली आहे. चला तर गम यासाठीचं साहित्य आणि कृती काय आहे याबाबत जाणून घेऊ.

साहित

मूग

मटकी

हिरव्या मिरच्या

अद्रक

लसून

पाणी

जिरे

कांदा

तेल

कृती

सर्वात आधी मूग पाण्यात रात्री भिजत ठेवा. मूग भिजल्यावर त्यातीत पाणी काढून ते कापडात बांधून ठेवा. यातील पाणी निघून गेल्याव ओलाव्याने त्याला छान मोड येतील. त्यानंतर मोड आलेले मूग मिक्सरमध्ये घ्या. त्यात थोडं पाणी एक हिरवी मिरची, आले, लसून आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घ्या. नंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या.

त्यावर एका चिरलेला कांदा मिक्स करा. तसेच थोडी हळद आणि जिरे मिक्स करा. तुमच्या आवडीनुसार यामध्ये अगदीच थोडा खाण्याचा सोडा मिक्स करा. आता या सर्व गोष्टी मिक्सरला छान बारिक करून घ्या. सर्व मिश्रण बारीक करून एकजीव करून घ्या. त्यात थोडं पाणी टाकून पातळ बॅटर बनवा. मिश्रण फार जास्त पातळ करू नका.

पुढे एका पॅनवर एक चमचा तेल टाका. त्यानंतर यामध्ये मधोमध मुगाचे बॅटर टाकून घ्या. हे बॅटर टाकल्यावर अलगद हाताने चमच्याच्या सहाय्याने तुम्हाला हवे तेवढे पातळ करून घ्या. अशा सिंपल स्टेप्सने तयार झाला मस्त मूग डोसा.

मूग प्रमाणे मटकीपासून सुद्धा तुम्ही असा डोसा बनवू शकता. हा डोसा तुमच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरेल. डायबीटीज, हार्ट पेशंट अशा व्यक्तींसाठी नाश्त्याला विविध पदार्थ बनवण्यापेक्षा हा डोसा नक्की खाल्ला पाहिजे. लहान मुलं देखील कडधान्यांच्या भाज्या खात नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांना सुद्धा हा डोसा खाण्यासाठी देऊ शकता.

Sprouts Dosa Recipe
Moong Dal Bhaji Recipe: रिमझिम पावसात घ्या गरमागरम मूग भजीचा आस्वाद, बनवा फक्त १० मिनिटांत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com