Tandlachi Bhakri Recipe : मऊ लुसलुशीत आणि पातळ आगरी स्टाईल तांदळाची भाकरी; कशी बनवायची वाचा रेसिपी

Rice Rotis Recipe : पाणी उकळल्यावर त्यामध्ये पीठ मिक्स करा. उकळी येण्याआधीच पाण्यात पीठ टाकू नका. पुढची कृती आणखी सोप्पी आहे.
Rice Rotis Recipe
Tandlachi Bhakri RecipeSaam TV

तांदळाची भाकरी खाणे प्रत्येकाला आवडतं. झणझणीत चिकन किंवा अन्य कोणत्याही नॉनव्हेज भाजीबरोबर तांदळाची भाकरी हवीच. अनेक व्यक्ती घरी छान भाकरी बनवता येत नाही त्यामुळे ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन अशा भाकरीवर ताव मारतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी या भाकरीची सिंपल रेसिपी आणली आहे.

Rice Rotis Recipe
Roti Samosa Recipe : उरलेल्या चपातीपासून बनवा स्वादिष्ट समोसे, पाहा रेसिपी

साहित्य

तांदळाचे पीठ

पाणी

कृती

तांदळाची ही भाकरी बनवण्यासाठी फक्त दोनच गोष्टींची आवश्यकता असते. आता सुरुवातीला एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाण्याला एक उकळी येऊ द्या. पाणी उकळल्यावर त्यामध्ये पीठ मिक्स करा. उकळी येण्याआधीच पाण्यात पीठ टाकू नका. पुढची कृती आणखी सोप्पी आहे.

पीठ पाण्यात टाकल्यावर ते छान मिक्स करून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा. तसेच पीठ थंड होण्याआधी गरम गरम थंड पाण्याचा हात घेऊन छान मळून घ्या. अशा पद्धतीने पीठ मळून घेतल्यावर एक मोठं ताट किंवा परात घ्या. त्यात थोडं पीठ घेऊन दोन्ही हाताने छान भाकरी थापण्यास सुरुवात करा. भाकरी बनवत असताना परातीला खाली पाणी लावून घ्या.

परात कोरडी पडणार नाही याची काळजी घ्या. तसेच जास्त पाणी होणार नाही याचीही काळजी घ्या. त्यानंतर भाकरी बनवत असताना ती छान फिरावी यासाठी परातीमध्ये सुक्कं पीठ घेऊ नका. सुक्कं पीठ घेतल्याने भाकरी जास्त कडक होते. त्यामुळे भाकरी बनवून काही तासांनी खायची असेल तर तेव्हा ती कडक होते. त्यामुळे भाकरी बनवताना फक्त पाण्याचा वापर करा.

भाकरी भाजत असताना आधी भाकरी जेव्हा तुम्ही बनवण्यासाठी घ्याल तेव्हाच तवा गॅसवर तापण्यासाठी ठेवा. तवा तापलेला नसताना त्यावर भाकरी टाकू नका. तवा छान तापल्यावर त्यावर भाकरी टाका. त्यानंतर भाकरी छान भाजून घ्या. तांदळाची भाकरी इतर भाकरीप्रमाणे भाजावी लागत नाही. भाकरी एका बाजूने भाजल्यावर दुसऱ्या बाजूने उलटा आणि ती छान फुलेपर्यंत भाजून घ्या. तयार झाली तुमची तांदळाची भाकरी. ही भाकरी तुम्ही कोणत्याही तिखट भाजीबरोबर खाऊ शकता.

Rice Rotis Recipe
Tandoor Roti: तुम्हीही तंदूर रोटी खाताय ? रेस्टॉरंटमध्ये बनवलेली तंदूरी रोटी ठरू शकते आरोग्यासाठी हानिकारक!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com