Blood Pressure saam tv
लाईफस्टाईल

Blood Pressure: थंडी वाढली की रक्तदाबाचा धोका वाढतो, वेळीच व्हा सावध; तज्ज्ञांना महत्वाचा सल्ला

Winter Health: थंडी वाढल्यामुळे रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नाकातून रक्त येणे, चक्कर येणे आणि बीपी अस्थिर होण्याचे प्रमाण वाढल्याने रुग्णालयांमध्ये गर्दी दिसून येत आहे.

Sakshi Sunil Jadhav

  • थंडी वाढताच रक्तदाब वाढण्याची शक्यता जास्त असते.

  • बीपी रुग्णांची संख्या रुग्णालयात लक्षणीयरीत्या वाढली आहे.

  • असंतुलित आहार, कमी हालचाल आणि जीवनशैलीतील बदल हे मुख्य कारणे आहेत.

हिवाळा वाढला की आरोग्याच्या समस्याही वाढू लागतात. कारण या वातावरणात शरीरातील नसा आकुंचन पावतात आणि रक्ताचा प्रवाह कमी होतो. यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो. या दिवसात रक्तदाबाचे अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. हा धोका टाळण्यासाठी तुम्ही तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करू शकता आणि हिवाळ्यात निरोगी आयुष्य जगू शकता.

हिवाळ्यात नाकातील नसा पातळ असल्यामुळे त्या दाबामुळे फुटू शकतात. त्यामुळे रक्तदाब वाढलेल्या रुग्णांना नाकातून रक्तस्त्राव होण्याची शक्यता अधिक असते. तज्ज्ञांच्या मते गेल्या काही दिवसांत रक्तदाब वाढलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाह्यरुग्ण विभाग तसेच आपत्कालीन विभागात रुग्ण येत आहेत आणि त्यांच्यावर तपासणी करून औषधोपचार दिले जात आहेत.

थंडी वाढल्याने लोकांच्या दैनंदिन सवयी, आहार आणि जीवनशैली बदलली आहे. अनेक जण ऊब मिळवण्यासाठी कमी फिरतात, जास्त खाणे-पिणे किंवा असंतुलित आहार घेतात. यामुळे वजन वाढते आणि रक्तदाब नियंत्रणात राहत नाही. डॉक्टरांनी सूचित केले आहे की, अशा काळात सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा निष्काळजीपणा गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतो.

तज्ज्ञांनी सांगितले की रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. आहारात गोड, खारट आणि आंबट पदार्थ कमी करावेत. सकाळी बाहेर जाण्यापूर्वी औषधे नियमितपणे घ्यावीत. ताजा, पौष्टिक आणि संतुलित आहार घ्यावा तसेच अल्कोहोलचे सेवन टाळावे. रक्तदाबाचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी काही उपायही डॉक्टरांनी सांगितले आहेत. नियमितपणे रक्तदाब तपासावा, वजन वाढू देऊ नये आणि तणाव नियंत्रणात ठेवावा.

आहारात हंगामी फळे, भाज्या आणि भरपूर पाणी यांचा समावेश करावा. तसेच थोडा वेळ उबदार उन्हात घालवणेही फायदेशीर ठरते. या थंड हवामानात योग्य काळजी घेतली तर रक्तदाब नियंत्रित ठेवता येऊ शकतो. अन्यथा वाढती थंडी आणि निष्काळजीपणा आरोग्यासाठी महागात पडू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'कोण कुठे चाललंय? कोणाच्या सोंगट्या कोणाच्या...'; राज ठाकरेंचा नाशिकमध्ये घणाघात|VIDEO

झाडं छाटायच्या आधी भाजपने पक्षातले कार्यकर्ते छाटले; राज ठाकरे नाशिकमधून गरजले

नाशिक दत्तक घेतो बोलल्यानंतर हा बाप फिरकलाच नाही; नाशिकमधून राज ठाकरे फडणवीसांवर हल्लाबोल

Maharashtra Live News Update: भाजप पक्षाला 2026 मध्ये पोरं दत्तक घ्यावी लागतात - राज ठाकरे

Turmeric Milk Benefits: थंडीत रोज हळदीचं दूध प्यायल्याने कोणते फायदे होतात?

SCROLL FOR NEXT