Sakshi Sunil Jadhav
सध्या लग्नाच्या गडबडमध्ये महिलांना स्वत: च्या सौंदर्याकडे लक्ष द्यायला मिळत नाहीत. त्यामध्ये आयब्रो न वाढण्याच्या समस्या अनेकांना सहन कराव्या लागत नाही.
पुढे आपण आयब्रो जाड करण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय पाहणार आहोत. ज्याच्या मदतीने तुमचे सौंदर्य अधिक खुलेल आणि कोणत्याही सणा-समारंभात तुम्ही सुंदर दिसाल.
एरंडेल तेल भुवया वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी भुवयांवर हे तेल हलक्या हाताने मसाज करा.
नारळाच्या तेलात नैसर्गिक फॅटी अॅसिड्स आणि प्रोटिन्स असतात. यामुळे केसांची जाडी वाढते आणि तुटणं कमी होतं.
कांद्याच्या रसात सल्फर असतो जो केसांच्या मुळांना मजबुत करतो. हा रस कॉटनने लावून 10 मिनिटांनी धुवा.
अॅलोवेरा जेल भुवया दाट आणि चमकदार बनवतात. रोज लावल्याने परिणाम लवकर दिसतात.
व्हिटॅमिन ई युक्त भरपूर बदामाचे तेल केसांची वाढ नैसर्गिकरीत्या वाढवते. हलक्या मसाज करत हे तेल भुवयांना लावा.
भिजवलेल्या मेथीची पेस्ट भुवयांवर लावल्याने केसांची वाढ होते आणि रिकाम्या जागा भरतात.
भुवयांवर दूध किंवा दही लावल्याने केराटीन उत्पादन वाढते आणि केस दाट होतात.