Lasun Chutney: रोज वरण भात खाऊन कंटाळलात? मग गरमा गरम भाकरीसोबत करा लसणाच्या स्पेशल चटणीचा बेत

Sakshi Sunil Jadhav

हिवाळ्यातला प्रसिद्ध मेन्यू

हिवाळा आला की अनेकांच्या जेवणात लाल तिखट, मसालेदार भाजी आणि चमचमीत पदार्थांची रेलचेल वाढते. पण या सगळ्यात एक खास चव चवीष्ट स्पेशल आयटम आहे लसणाच्या पातीची झणझणीत चटणी.

Thecha Recipe | yandex

महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी चटणी

कमी साहित्य, सोपी रेसिपी आणि भन्नाट चव यामुळे हिवाळ्यात या चटणीची खास मागणी असते. ही चटणी फक्त चविष्टच नाही तर शरीरात उष्णता निर्माण करून सर्दी-खोकला, पचन समस्या आणि थकवा कमी करण्यास मदत करते.

garlic chutney recipe

लसणाच्या पातीच्या चटणीचे साहित्य

चिरलेली लसणाची पात १ जुडी, जिरे २ टेबलस्पून, हळद अर्धा चमचा टीस्पून, लाल तिखट अर्धा चमचा, शेंगदाणे २ टेबलस्पून, मीठ, तेल इ.

spicy chutney recipe

सोपी रेसिपी

सुरुवातीला शेंगदाणे हलके भाजून त्याचा जाडसर कूट करून घ्या. मिक्सरमध्ये लसणाची पात, मिठ, हळद, तिखट आणि जिरे घालून चटणी वाटून घ्या.

Maharashtrian chutney

चटणीला फोडणी द्या

आता कढईत तेल गरम करून ही चटणी त्यात टाका आणि त्यात शेंगदाण्याचा कूट मिसळा. पाच मिनिटे मंद गॅसवर परतून घेतल्यावर चटणी तयार होईल.

Maharashtrian chutney

चटणीचे विविध फायदे

शरीराला उष्णता देते त्यामुळे हिवाळ्यातली थंडी कमी जाणवते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते सर्दी-खोकल्यापासून नैसर्गिक संरक्षण होतं. पचन सुधारते मसाले आणि लसूण पोटासाठी फायदेशीर.

Maharashtrian chutney

मेटाबॉलिझम वाढवते

थंडीत सुस्तावलेले शरीर सक्रिय करते. लसूण आणि जिऱ्याचे गुणधर्म आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात.

Maharashtrian chutney

शेंगदाण्यांचे फायदे

शेंगदाण्यांमुळे प्रोटीन व गुड फॅट्स मिळतात. भूक वाढवण्यास मदत करते. थंडीत कमी झालेली भूक वाढते.

Maharashtrian chutney

झटपट रेसिपी

लसणाची चटणी जेवणात चव आणि तिखटपणा वाढवते. चपाती, भात किंवा भाकरीसोबत खाणं उत्तम आहे. कमी साहित्य आणि १० मिनिटांत चटणी तयार होते.

Maharashtrian chutney

NEXT: Momos Health Risk: मोमोज खाणं आरोग्यासाठी धोक्याचं, तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Momos Health Risk
येथे क्लिक करा