Sakshi Sunil Jadhav
सध्याच्या पिझ्झा, सँडविच, बर्गरसोबतच मोमोजची लोकप्रियताही झपाट्याने वाढत आहे. शहरांमध्ये मोमोजचे स्टॉल सर्वत्र दिसतात. त्यामुळे तरुणांपासून मुलांपर्यंत सर्वजण ते चवीने खाताना दिसतात. पण हे मोमोज आरोग्यासाठी किती सुरक्षित आहेत? याची माहिती जाणून घेऊ.
मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ भक्ती सामंत आणि उजाला सिग्नस हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी मोमोजचे आरोग्यावर होणारे परिणाम ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना स्पष्ट केले आहेत.
मोमोजच्या बाहेरील कवचासाठी वापरला जाणारा मैदा फायबररहित असून तो लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब वाढवू शकतो.
भाज्या किंवा मांस असले तरी मोमोजमध्ये पोषणमूल्य अत्यंत कमी असते.
मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG) वापरल्यास पचनशक्ती मंद होते आणि सोडियममुळे BP व किडनीच्या रुग्णांसाठी धोका वाढतो.
रस्त्यावरचे स्वस्त मोमोज अनेकदा निकृष्ट दर्जाच्या सामग्रीने बनवले जातात.
चांगले न शिजल्यामुळे पोटाचे विकार, उलट्या आणि फूड पॉइझनिंगचा धोका संभवतो.
मोमोजसोबत मिळणारी मसालेदार चटणी अॅसिडिटी, पोटदुखी आणि पचनाचे त्रास वाढवते.
तळताना तेल आणि कॅलरी वाढतात, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त.
चायनीज सॉस, सोया सॉस यामध्ये जास्त प्रमाणात मीठ आणि MSG असते, ज्यामुळे शरीरात पाणी धरून राहते. वारंवार खाल्ल्यास पचनाचे आजार, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि वजन वाढण्याचे प्रमाण वाढते.