Sakshi Sunil Jadhav
नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत निसर्ग, हिल स्टेशन, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक किल्ल्यांचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक महाराष्ट्रात दौरे करायला निघतात. जर तुम्हीही वर्षाच्या शेवटी प्रवासाची योजना आखत असाल, तर खालील ठिकाणे तुमच्या बकेट लिस्टमध्ये जरूर ठेवा.
हिवाळ्यात महाबळेश्वरचे हवामान अत्यंत सुखद असतं. स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल, एलीफंट पॉइंट, वेण्णा लेक आणि प्राणी संग्रहालय ही येथे बघण्यासारखी ठिकाणे आहेत.
मुंबई-पुण्याच्या जवळ असल्याने हिवाळ्यात ही ठिकाणे पर्यटकांनी गच्च भरलेली दिसतात. भुशी डॅम, लॉयन पॉईंट आणि राजमाची किल्ला जरूर पाहावा.
सह्याद्रीतील हे शांत आणि धुक्याने भरलेले ठिकाण हिवाळ्यात स्वर्गापेक्षा कमी नाही. धबधबे, घनदाट जंगल आणि पक्षीनिरीक्षणामुळे अंबोलीचे आकर्षण वेगळे आहे.
नोव्हेंबर-डिसेंबर हा स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्सचा सर्वोत्तम सीझन आहे. स्वच्छ समुद्र, ताजे सीफूड आणि सिंधुदुर्ग किल्ला या पर्यटनाची मजा वाढवतात.
शांतता, धरणे आणि हिरवाईचा सुंदर संगम म्हणजे भंडारदरा. हिवाळ्यात तुम्ही इथे कॅम्पिंग आणि गरमागरम मॅगीचा अनुभव कधीच विसरता न येणारा अनुभव घेऊ शकता.
इतिहासप्रेमींसाठी छ. संभाजी नगरमधील अजिंठा वेरूळचा परिसर हिवाळ्यात स्वर्गासारखाच दिसतो. युनेस्को मानांकित गुहा, बीबी का मकबरा आणि देवगिरी किल्ला तुम्ही एक्सपोर करू शकता.
धार्मिक यात्रेसाठी उत्तम ठिकाण म्हणजे पंढरपूर. विठ्ठल मंदिर, उजनी बॅकवॉटर आणि नागराळा जवळचे पक्षीनिरीक्षण तुम्ही पाहू शकता.
विदर्भातील एकमेव हिल स्टेशन म्हणजे चिखलदरा. वन्यजीव, धबधबे आणि शांत हवामानामुळे हिवाळ्यात चिखलदरा पर्यटकांचे खास आकर्षण ठरते.