Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य यांना भारतातील महान बुद्धिमान व्यक्तींमध्ये स्थान दिले जाते. ते फक्त अर्थशास्त्रज्ञच नाही तर उत्तम राजनितिज्ञ, तत्त्वज्ञ आणि जीवनाचे मार्गदर्शकही होते. त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये आयुष्य, व्यक्तिमत्त्व, नातेसंबंध, शिस्त, ज्ञान आणि व्यवहार या सर्व गोष्टींविषयी महत्त्वपूर्ण विचार आणि सूत्रे दिली आहेत.
चाणक्य म्हणतात, एखाद्या व्यक्तीला मान हा त्याचे पद, पैसा यावरून होत नाही, तर त्याच्या गुणांवरून, वागणुकीवरून आणि समाजासाठी केलेल्या कार्यावरून होतो. जर व्यक्तीने या काही गोष्टी जीवनात पाळल्या तर समाजात त्याचा मान, प्रतिष्ठा आणि आदर कायम टिकून राहतो.
चाणक्य म्हणतात, जो इतरांचा आदर करतो, त्यालाच समाजात आदर मिळतो. अपमान करणाऱ्या व्यक्तीला कुणीही मान देत नाही.
फक्त ज्ञान असणे पुरेसे नाही, ते समाजाच्या हितासाठी वापरणं सर्वात मोठं कर्तव्य आहे.
जी व्यक्ती आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडते, society त्याचाच आदर करते.
अभिमान व्यक्तीला खाली आणतो, तर विनम्रता मान वाढवते. इतरांना दुखावण्यात आनंद घेणाऱ्या लोकांचा समाजात मान राहत नाही.
चाणक्य म्हणतात, जो व्यक्ती सत्य, प्रामाणिकता आणि नैतिकतेवर ठाम राहतो त्याला जगातलं कुठलंही संकट डगमगवू शकत नाही.
राग, उतावीळ निर्णय आणि चुकीचा व्यवहार व्यक्तीचा मान कमी करतो. जग बदलतंय, ज्ञान वाढवत राहणारा व्यक्ती नेहमीच प्रगती करतो.
स्वहितापेक्षा समाजहित महत्त्वाचं मानणाऱ्या लोकांना कायम सन्मान मिळतो. आचार्य चाणक्यांच्या नीतीमध्ये जीवन जगण्याचं शहाणपण आहे. जर व्यक्तीने ज्ञान, विनम्रता, प्रामाणिकता आणि जबाबदारी या चार गोष्टी आत्मसात केल्या तर समाजात त्याची प्रतिष्ठा कायम राहते.