Sakshi Sunil Jadhav
लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात खास आणि भावनिक क्षण असतो. या दिवशी प्रत्येक नवरीला तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि उत्साही दिसायचं असतं. मात्र, लग्नाच्या तयारीतली धावपळ, विधी, वेळेचे बंधन आणि झोपेचा अभाव यामुळे अनेक नवऱ्यांना लग्नाच्या अगदी दिवशी थकवा, चिडचिड, तणाव आणि ऊर्जा कमी असल्यासारखं जाणवतं.
तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती दुर्लक्षित केली तर लग्नाची मजा कमी होण्याबरोबर मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नवरीने लग्नाच्या काही दिवस आधी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
लग्नापूर्वी किमान ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे. झोप कमी झाल्यास चेहरा थकलेला दिसतो आणि मूड स्विंग्स वाढतात.
दूध, दही, प्रथिनयुक्त अन्न, भाज्या, ड्रायफ्रूट्स आणि हायड्रेशनवर लक्ष द्या. बाहेरचं किंवा प्रोसेस्ड अन्न टाळा.
धावपळीत जेवण स्किप करू नका. दीर्घकाळ उपाशी राहिल्यास कमजोरी आणि थकवा वाढतो.
लग्नापूर्वी किमान एक महिना आधी व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, फॉलिक अॅसिड आणि हिमोग्लोबिन तपासून घ्या. कमतरता असल्यास योग्य उपचारासाठी वेळ मिळतो.
पाणी, नारळपाणी, सूप किंवा लिंबूपाणी सारखी द्रवपदार्थं जास्त घ्या. हे शरीरात ऊर्जा टिकवतात.
जॉगिंग, चालणे, योगा, ब्रिदिंग एक्सरसाईज मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढवतात. जिममध्ये जड व्यायाम करू नका.
ध्यान, श्वसनाचे व्यायाम (Breathing Exercise), म्युझिक थेरपी यांचा उपयोग तणाव कमी करण्यासाठी करू शकता.
मेहेंदी, हळद, ब्यूटी ट्रीटमेंट्स आणि ड्रेस ट्रायल शेवटच्या क्षणी करू नका. यामुळे अनावश्यक ताण येतो. गर्दीत आणि विधींमध्ये स्वतःला हरवू नका. थोडा वेळ आरशासमोर बसून रिलॅक्स होणंही महत्त्वाचं आहे.