Sakshi Sunil Jadhav
टिफिनमध्ये किंवा सकाळ-संध्याकाळच्या नाष्ट्यासाठी पराठे अनेक घरांमध्ये बनवले जातात. स्टफ पराठा हा खवय्यांमध्ये विशेष लोकप्रिय असून प्रवासासाठीही हे सहज कॅरी करता येतात.
बऱ्याचदा पराठे व्यवस्थित लाटता येत नाहीत, नीट शेकत नाहीत. त्यामुळे पराठे बनवण्याची ईच्छाच कमी होते. ही समस्या टाळण्यासाठी पराठा बनवण्याची प्रक्रिया योग्य असणे आवश्यक आहे. यावर सोप्या टिप्स जाणून घेऊ.
कणिक सैल झाले तर पराठा लाटताना फाटतो. स्टफ केल्यानंतर पराठा लाटण्यापूर्वी हातावर थोडा थापावा. यामुळे सारण समान पसरते आणि पराठा फाटत नाही.
कडा पातळ असल्यास स्टफिंग बाहेर येते. म्हणून लाटताना कडा जाड ठेवा.
पूर्ण मैदा न वापरता गव्हाच्या पिठात थोडा मैदा घातल्यास पराठा लाटताना तुटत नाही.
कांदा किंवा भाज्या मोठ्या तुकड्यात असतील तर लाटताना अडथळा निर्माण होतो. स्टफिंग केल्यानंतर पराठा लगेच लाटू नका. थोडा हाताने थापून मग लाटण्यास सुरुवात करा.
पराठा केवळ बाहेरून नाही तर आतूनही व्यवस्थित शिजला पाहिजे. भाजताना आधी एक बाजू आणि नंतर दुसरी बाजू शेकावी. यामुळे सारण घट्ट होते आणि पराठा फुलतो.
भाजल्यानंतर तूप किंवा तेल लावल्यास पराठा मऊ राहतो. यामुळे पराठा कोरडा होत नाही आणि चव सुधारते.