Sakshi Sunil Jadhav
परदेशी फिरायचं स्वप्न अनेक जण बाळगतात. पण सुट्ट्या कमी आणि बजेटचा लोच्या असल्यामुळे अनेकदा हा प्लॅन पुढे ढकलला जातो. पण आता ३ दिवसांच्या लाँग वीकेंडमध्ये कमी खर्चात परदेश फिरण्याची संधी उपलब्ध आहे.
कारण भारताजवळील कझाकिस्तान हा देश केवळ सुंदरच नाही, तर बजेटमध्ये सहज फिरून होणारा देश आहे. कझाकिस्तानला जाण्यासाठी दिल्ली आणि मुंबईहून थेट फ्लाइट्स उपलब्ध असल्यामुळे हा प्रवास जास्त सोयीस्कर ठरतो.
जर तुमच्याकडे २ ते ३ दिवस सुट्टी असेल तरी तुम्ही कझाकिस्तान सहज एक्सप्लोर करू शकता. त्यामुळे लाँग वीकेंडला हा देश फिरण्यासाठी उत्तम आहे.
दिल्ली आणि मुंबईहून अल्माटी (Almaty) येथे थेट विमानसेवा उपलब्ध असल्यामुळे प्रवास सोपा आणि कमी वेळात पूर्ण होतो.
कझाकिस्तानसाठी पर्यटकांना ट्रान्झिट व्हिसा मिळू शकतो. मात्र, त्यासाठी परतीचे तिकीट ७२ तासांच्या आत असणे आवश्यक आहे.
कझाकिस्तानचे चलन टेंगे आहे. भारताचे १०,००० रुपये येथे तब्बल ५८,२७० टेंगे होतात.
तुम्हाला इथे अन्न खूप स्वस्त दरात मिळेल. ८० ते ९० रुपयांमध्ये बर्गर किंवा स्नॅक्स मिळू शकतात. तसेच नाइटलाइफ आवडणाऱ्यांसाठी हा देश उत्तम ठिकाण मानला जातो.
कझाकिस्तान हा जगातला ९वा सर्वात मोठा देश आहे. ईथे दऱ्या, डोंगर, तलाव आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळेल.
Big Almaty Lake हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. समुद्रसपाटीपासून २५११ मीटर उंचीवर असलेला हा तलाव अत्यंत नयनरम्य दिसतो.
या उद्यानात पॅनफिलोव्हच्या २८ सैनिकांची स्मारके आहेत. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले. तसेच केबल कारमधून टेकडीपर्यंत जाता येते. वर रेस्टॉरंट्स, दृश्य पॉइंट्स आणि मिनी झू आहे.