Sakshi Sunil Jadhav
हिवाळा म्हटलं की गरमागरम मक्याची भाकरी आणि झणझणीत रस्सा हा कॉम्बो अगदी लज्जतदार मानला जातो. पण अनेकांना मक्याची भाकरी बनवताना खूप अडचणी येतात.
पुढे आपण भाकरी कडक होऊ नये तसेच थापताना तुटू नये म्हणून काही सोपे उपाय आणि ट्रिक्स जाणून घेणार आहोत. त्याच्यामदतीने तुम्ही उत्तम जेवणाचा बेत आखू शकाल आणि लोक आयुष्यभर तुमच्या स्वयंपाकाचे कौतूक करतील.
मक्याचे पीठ मळताना उकळते पाणी घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ घाला. मग पीठ मिक्स करून मिश्रण थंड झाल्यावर मळा.
पीठ मऊ झाल्यानंतर त्यावर थोडेसे तूप लावा आणि झाकून १० मिनिटे ठेवून द्या. यामुळे पीठ सेट होते आणि थापताना किंवा लाटताना भाकरी तुटत नाही.
तुमची भाकरी तव्याला खूप चिकटत असेल तर हलकं तेल लावा आणि कागदाने पूसून घ्या. जर भाकरी हाताने बनवत असाल तर हातावर तूप लावा आणि थापा.
जर भाकरी थापताना किंवा लाटताना तुटत असेल तर बेकिंग पेपरवर भाकरी लाटा. मग हळूच पेपर उलटा करून ती भाकरी तव्यावर सोडा. भाकरी अजिबात तुटणार नाही.
खूप गरम तवा तव्यावर भाकरी पटकन कडक होते. मध्यम आचेवर भाकरी शेकल्यास ती फुगते आणि मऊ होते.
भाकरी पलटताना हलकेसे पाणी लावल्यास ती अधिक नरम होते. गरम तव्यावर लगेच तूप लावले तर भाकरी स्वादिष्ट आणि सॉफ्ट राहते.