Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य यांना त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि दूरदृष्टीसाठी संपूर्ण जगात आजही ओळखले जाते. त्यांनी आपल्या चाणक्य नितीमध्ये माणसाचे जीवन, चुका, गुण आणि कर्मांचे परिणाम यावर सखोल मार्गदर्शन केले आहे.
चाणक्यांचे मते, काही विशिष्ट कर्म अशी असतात की त्यामुळे व्यक्ती कितीही बुद्धिमान, श्रीमंत असला तरी शेवटी त्याला अपमान, दुःख भोगावे लागते. पुढे आपण जाणून घेऊया त्या कर्मांविषयी, ज्यापासून बुद्धिमान माणूस नेहमी लांब राहतो.
चाणक्यांच्या मते, जो व्यक्ती इतरांचा सतत अपमान करतो तो कधीच समाजात आदर मिळवू शकत नाही. अशा व्यक्तीला शेवटी एकटेपणा आणि अपमानाचाच सामना करावा लागतो.
चाणक्य म्हणतात, खोट्यावर आधारलेलं यश कधीच टिकत नाही. फसवणूक करून मिळालेले फळ शेवटी लाज आणि पश्चात्तापात बदलते.
आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जे लोक काम पुढे ढकलतात, त्यांना गरीबी आणि अपयशाचा सामना करावा लागतो.
वाईट लोकांच्या संगतीत राहिल्यास चांगल्या स्वभावाचा व्यक्तीही बिघडतो. याचा परिणाम म्हणजे बदनामी, चुकीचे निर्णय आणि आयुष्याचे नुकसान आहे.
चाणक्य म्हणतात की, जो व्यक्ती पैसे विचार न करता खर्च करतो तो लवकरच कर्जात आणि अडचणीत सापडतो. पैशांचा योग्य उपयोगच समृद्धी आणि स्थैर्य आणतो.
जास्त राग व्यक्तीला बुद्धीहीन बनवतो आणि संबंध नष्ट करतो. जे लोक उपकारांची कदर करत नाहीत, त्यांना आयुष्यात कधीच खरी नाती मिळत नाहीत.
जास्त लोभ किंवा हव्यास शेवटी व्यक्तीला चुकीच्या मार्गावर नेतात. चूक मान्य न करणारे लोक कधीच प्रगती करू शकत नाहीत.