Sakshi Sunil Jadhav
गावाकडच्या स्वयंपाकघरात भाकरी हा रोजच्या आहाराचा मुख्य भाग असतो. पण बऱ्याचदा सकाळी केलेल्या भाकऱ्या दुपारपर्यंत कोरड्या, कडक किंवा वातड होतात. काही सोप्या घरगुती टिप्स वापरून तुम्ही भाकरी दिवसभर मऊ, लुसलुशीत करू शकता.
भाकरीचं पीठ नेहमी कोमट किंवा गरम पाण्याने मळा. त्यामुळे भाकरी जास्त मऊ आणि टिकाऊ बनते.
पीठ मळून झाल्यावर ते थोडावेळ विश्रांतीला ठेवल्यास भाकरी मऊ बनते. तसेच पिठातील ओलावा समान पसरतो.
पिठात एक चमचा तेल घातल्यास भाकरी फुलते आणि ओलावा टिकतो. तसेच भाकरी वातड होण्याच्या समस्या कमी होतात.
जास्त आचेवर भाकरी शेकल्यास ती पटकन कोरडी होते. मध्यम किंवा मंद आचेवर भाकरी मऊ राहते.
भाकरी पलटण्यापूर्वी तव्यावर थोडे पाणी शिंपडल्यास भाकरी ओलसर राहते. विशेषत: नाचणी व ज्वारीच्या भाकरी ही ट्रीक बेस्ट आहे.
गरम भाकरी बंद डब्यात ठेवल्यास वाफेमुळे त्या ओली आणि नंतर कडक होतात. आधी थोड्या थंड होऊ द्या.
भाकरी स्वच्छ कापडात गुंडाळल्यास ओलावा टिकतो व वातडपणा येत नाही. ग्रामीण भागात ही पद्धत अजूनही बेस्ट मानली जाते.
शेकून झाल्यावर हलकं तूप लावल्यास भाकरी संपूर्ण दिवस मऊ राहते. चवही वाढते. डब्यात एक टिश्यू ठेवल्यास जास्त वाफ शोषली जाते. तसेच भाकरी ओलसर किंवा कोरडी दोन्ही होत नाही.