Heart problems in children Saam tv
लाईफस्टाईल

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

Lifestyle diseases in kids : पालकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. एका अहवालानुसार ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये भयंकर आजार वाढत आहे.

Vishal Gangurde

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे अनेक लहान मुले गंभीर आजाराच्या विळख्यात सापडू लागले आहेत. राष्ट्रीय पोषण सर्वेक्षणाचा २०२५ चा बाल अहवालात भारतातील १६ टक्के किशोरवयीन मुले (१० ते १९ वर्षे वयोगट) ट्रायग्लिसराइड्सची पातळी ही सामान्यपेक्षा जास्त असल्याचे आढळून आली आहे. ट्रायग्लिसराइड्स हा रक्तात आढळणारा चरबीचा एक प्रकार आहे. त्याची पातळी जास्त वाढल्यास हृदय आणि धमन्यांसाठी धोकादायक ठरते.

ट्रायग्लिसराइड्सची समस्या लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. ही पातळी ५ ते ९ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये चितांजनक आहे. पश्चिम बंगालमध्ये या वयोगटातील ६७ टक्के मुलांमध्ये ट्रायग्लिसराइड पातळी वाढलेली दिसून आली. तर सिक्कीममध्ये ६४ टक्के, आसाममध्ये ५७ टक्के, नागालँडमध्ये ५५ टक्के आणि मणिपूरमध्ये ५४ टक्के मुलांमध्ये ही पातळी वाढलेली दिसून आली. यात केरळमधील मुलांमध्ये ही समस्या १६.६% इतकी दिसून आली.

दिल्लीतील राजीव गांधी रुग्णालयातील हृदयरोग विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अजित जैन यांनी म्हटलं की, '10 वर्षांखालील मुलांमध्ये ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण अधिक असणे चिंताजनक आहे. त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर प्लेक जमा होण्याची शक्यता असते. याने रक्तवाहिन्या देखील अरुंद होऊ शकतात. यामुळे हृदयरोग आणि स्टोकचा धोका वाढण्याची शक्यता असते. मात्र, आहारात बदल केला नाहीत, तर मुलामध्ये आजाराची गुंतागुंत होऊ शकते.

ट्रायग्लिसराइड्सची समस्या का वाढतेय?

खाण्याच्या चुकीच्या पद्धती

शरीराची कमी हालचाल

तळलेले पदार्थ अतिप्रमाणात खाणे

गोड पेय, पाकिट बंद पदार्थ अतिप्रमाणात खाणे

मोबाईलवर सारखं गेम खेळत राहणे

मैदानी खेळ कमी खेळणे

मुलांचं आजारापासून कसं संरक्षण कराल?

पालक आणि कुटुंबातील सदस्यांनी लहानपणापासून मुलांमध्ये घरातील पदार्थ खाण्याच्या सवयी लावल्या पाहिजे. त्यात ताजी फळे, भाज्या, काजू याचा समावेश असावा. तसेच मुलांना दिवसभरात शारिक हालचाली करायला सांगाव्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टेस्ट, वनडे आणि टी-२० नंतर क्रिकेटमध्ये नव्या फॉरमॅटची एन्ट्री! कुठे आणि कधी होणार सुरूवात? नियम कोणते?

Horoscope Sunday: कामाच्या ठिकाणी होतील वाद, वाचा तुमच्या राशीत काय?

Bacchu Kadu :...तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू; बच्चू कडू असे का म्हणाले?

Manoj Jarange: डोळ्यावर गॉगल आणि घोड्यावर स्वारी; मनोज जरांगेंचा हटके लूक व्हायरल, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

SCROLL FOR NEXT