Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

Nilesh Ghaywal News : निलेश घायवळ लंडनला पळाल्याची माहिती समोर आलीये. या प्रकरणात पुणे पोलिसांनी पुढील प्लान देखील सांगितला आहे.
Nilesh Ghaywal news
Nilesh Ghaywal Saam tv
Published On
Summary

पुण्यातील कोथरूड भागात गोळीबाराची गंभीर घटना

कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई

निलेश घायवळ टोळीतील ७ जणांना अटक

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे : पुण्यातील कोथरुड गोळीबार प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडका सुरु केला आहे. पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. तर पुणे पोलिसांनी टोळीतील ७ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर टोळीचा म्होरक्या लंडनला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यालाही लवकरच अटक करणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले.

गुंड निलेश घायवळवर हत्या, खंडणी, अपहरण सारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. तरीही निलेश घायवळ पासपोर्टच्या जोरावर परदेशी पळाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे गुंड घायवळला पासपोर्ट कसा मिळाला, असा प्रश्न समोर आला आहे. कुख्यात गुंड घायवळने त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमाच केला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या पुढील कारवाईवर साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Nilesh Ghaywal news
Akola : अकोल्यातील मंडळ अधिकाऱ्याचा आगाऊपणा; 200 एकर शेत जमीन पाण्याखाली, तहसीलदाराने काय सांगितलं?

पुणे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती देताना म्हटलं की, 'पुण्यात कोथरूडमध्ये १७ तारखेला घटना गोळीबार घटना घडली होती. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी नीलेश घायवळ टोळीच्या सात जणांना अटक केली. निलेश घायवळ टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. निलेश घायवळवर जवळपास 15 ते 20 प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या,खंडणी, मकोको असे गंभीर गुन्हे दाखल आहेत'.

Nilesh Ghaywal news
Marathwada Floods : पाऊस थांबेना, संकट संपेना! मराठवाड्यावर पावसाचं सावट कायम, हवामान विभागाने काय इशारा दिला?

'आता निलेश घायवळ परदेशात असल्याची माहिती आहे. त्याला लुक आउट नोटीस काढली आहे. अनेक गंभीर गुन्हे दाखल असताना तो परदेशात कसा गेला, याचा तपास पुणे पोलिस करत आहेत. तो परदेशातून परत आल्यानंतर त्याला आम्ही ताब्यात घेऊ. परदेशात त्याचा मुलगा शिक्षण घेत आहे. त्यासाठी त्याच्याकडे गेल्याची माहिती मिळत आहे, असे पुणे पोलीस उपायुक्त पुढे म्हणाले.

Nilesh Ghaywal news
निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

'निलेश गायवळ परदेशात कसा गेला याचा तपास पोलीस करत आहेत. निलेश घायवळ याच्या विरोधात कोणाला तक्रार असेल तर त्यांनी पोलिसात येऊन सांगावी, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com