Early heart attack symptoms google
लाईफस्टाईल

Heart Attack : फक्त छातीत दुखणं, नव्हे तर ही आहेत हार्ट अटॅकची लक्षणं, आताच वाचून घ्या अन्यथा...

Young Heart Health: डिजिटल जीवनशैली, ताण, फास्ट फूड आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढते आहे. सुरुवातीची लक्षणे ओळखा आणि वेळेत जीवनशैलीत बदल करा.

Sakshi Sunil Jadhav

सध्या लोक डिजिटल युगात वावरत आहेत. पुर्वी लोकांकडे डिजिटल उपकरणं जास्त प्रमाणात नव्हती आणि लोक खूप जड कामं करायचे. शेतात राबणं, सतत शारीरिक हालचालींची कामे करायचे. मात्र आता लाइफस्टाइल पुर्णपणे बदलली आहे. लोक तासंतास बसूनच कामं करतात.

मेंदू आणि डिजिटल उपकरणांचा वापर हीच एक सवय लोक फॉलो करत आहेत. काहींना आता वर्क फ्रॉमच्याही सुविधा उपलब्ध आहेत. यासगळ्या चांगल्या गोष्टी असल्या तरी शरीराला याने नुकसान होतंय. लोकांना कमी वयातच म्हातारपणात होणारे आजार होतायेत. विशेषत: तरुण मंडळींचा यामध्ये समावेश होत आहे.

सध्या तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. २४ वयाची मुलंही हार्ट अटॅकच्या समस्येला सामोरी जात आहेत. यामध्ये तरुणाईची चूक म्हणजे व्यायाम टाळणं, तासंतास बसून काम करणं, कमी झोप, सतत स्क्रीनिंगचा वापर, धुम्रपान, स्ट्रीट फुड्स आणि मानसिक ताण आहे.

चुकीचा आहार, फास्ट फूडचं वाढतं सेवन, यामुळे तुमचं हृदय हळूहळू कमकुवत होत जातं. त्याच्या कार्यात अनेक अडथळे येतात. काही पदार्थांनी तुमच्या शरीराचं नुकसान होतं जे तुम्हाला कधीच जाणवत नाही. त्याचसोबत तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची लक्षणे माहित नसतात. हा आजार तुम्हाला खूप दिवसा अगोदरच संकेत देत असतो. पण तुम्ही त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करता. पुढे आपण याचीच लक्षणे आणि जीवनशैलीतले महत्वाचे बदल जाणून घेणार आहोत.

बहुतेक लोक हार्ट अटॅक म्हणजे छातीत दुखतं असंच समजतात. कधीकधी छातीत जडपणा जाणवतो, दडपण आल्यासारखं वाटतं, जळजळ किंवा अस्वस्थ वाटतं, ही वेदना डाव्या हातापासून खांदा, मान, जबडा किंवा पाठीपर्यंत पसरू शकते. काही वेळेस थोडं चालल्यावर किंवा जिने चढल्यावर दम लागणं हेही हृदय कमकुवत झाल्याचे संकेत असू शकतात. रोजची साधी कामे करतानाही थकवा, अचानक थंड घाम, चक्कर किंवा बेशुद्ध पडल्यासारखं वाटणं ही लक्षण दुर्लक्षित करू नये. ही हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधीची लक्षणे असतात.

कधी कधी गॅस, अपचन, पोटात जळजळ किंवा जडपणा यांसारखी लक्षणंही हार्ट अटॅकपूर्वी दिसू शकतात. विशेषतः महिलांमध्ये ही लक्षणं जास्त दिसतात. रात्री झोप न लागणं, घाबरल्यासारखं वाटणं किंवा श्वास घ्यायला त्रास होऊन जाग येणं या सगळ्या लक्षणांची माहिती डॉक्टरांना द्या. त्यावर उपचार करा. चांगली आणि हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करा. संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान आणि मद्यपानापासून लांब राहा. अन्यथा तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागू शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR filing: ITR भरण्यासाठी उरले २४ तास; फक्त १० मिनिटांत घरबसल्या रिटर्न भरा, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Maharashtra News Live Update: ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Railway Accident : नागपुरात भयंकर दुर्घटना! रेल्वे रुळावर २ भावांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले; नेमके काय घडले?

ठाण्याच्या विकासाला नवी झळाळी! सिद्धेश्वर तलावाजवळील ५० एकरांहून अधिक क्षेत्रात उभारणार ‘ग्रेड A+’ व्यावसायिक प्रकल्प

पंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात; एका वारकऱ्याचा मृत्यू, ११ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT