

तामिळनाडूमध्ये सध्या सत्तेवर असलेल्या टीव्हीके (TVK) या पक्षाने शनिवारी अधिकृतपणे 'इंडिया' (INDIA) आघाडीत प्रवेश केला. या पक्षाने पहिल्यांदाच 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत सहभाग घेतला. टीव्हीकेही इंडिया आघाडीच्या निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होणार आहे.
तामिळनाडू काँग्रेस कमिटीचे (TNCC) अध्यक्ष माणिकम टागोर यांनी याबाबत सांगितले की, 'इंडिया' (INDIA) आघाडीसाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, DMKनं इंडियातून बाहेर पडलीय. आतापर्यंत तामिळनाडूमध्ये 'इंडिया' आघाडीतील सर्वात मोठा घटक पक्ष द्रमुक DMK हा होता. मात्र एकही खासदार नसलेल्या विजय यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने इंडिया आघाडीत प्रवेश केलाय.
तमिळनाडू काँग्रेस समितीचे अध्यक्ष माणिकम टागोर यांनी म्हटलं की, टीव्हीकेच्या आगमनामुळे 'इंडिया' (INDIA) आघाडी अधिक मजबूत होईल. तमिळनाडूमध्ये आरएसएस (RSS) आणि भाजप आणि मोदी व अमित शहा यांच्या कारभाराविरुद्धचा लढा तमिळनाडूमध्येही आता रंजक वळण घेणार आहे. टागोर यांनी पुढे सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जिल्हा पातळीवर निदर्शने करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.