Sakshi Sunil Jadhav
आवळा हा व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत मानला जातो. पचन सुधारण्यासाठी, केसांची वाढ वाढवण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे.
आवळा व्हिटॅमिन C ने समृद्ध असून तो पचन सुधारतो, मेटाबॉलिझम वाढवतो आणि केस पांढरे होण्यापासून वाचवतो.
ताजे किंवा फ्रोजन आवळे, साखर, काळं मीठ, पिठीसाखर इत्यादी साहित्य आवळ्यासाठी पुरेसं आहे.
स्टीमर किंवा प्रेशर कुकर, चाळणी(Sieve Set), बेकिंग ट्रे, ओव्हन (असल्यास) इ.
आवळे 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्या. स्टीमर नसेल तर प्रेशर कुकरमध्ये 1 शिट्टीपर्यंत शिजवा. जास्त शिजवू नका.
वाफवलेल्या आवळ्यांच्या बिया काढून हाताने फोडी वेगळ्या करा. जर फोडी कडक वाटत असतील तर थोडं जास्त वाफवा.
फोडींमध्ये साखर आणि काळं मीठ घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण एक दिवस तसेच ठेवा.
दुसऱ्या दिवशी तयार झालेला जास्तीचा पाक गाळून घ्या. हा पाक सोड्याच्या पाण्यात मिसळून पिता येतो.
बेकिंग ट्रेवर बटर पेपर घालून फोडी पसरवा. 2 ते 3 दिवस सावलीत वाळवा. पहिल्याच दिवशी कँडी कोरडी होण्यास सुरुवात होते.