Rice Size Pacemaker Injection saam tv
लाईफस्टाईल

Heart Pacemaker: तांदळाच्या आकाराचा पेसमेकर; हृदयात कसं बसवणार, काम कसं करणार जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rice Size Pacemaker Injection: हृदयविकाराच्या वाढत्या रुग्णांमुळे संपूर्ण जगातील आरोग्य तज्ज्ञ चिंतेत आहेत. अशातच नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एक नवं संशोधन केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. मात्र वैद्यकीय विज्ञानात प्रगती होत असल्याने यावर उपचार देखील उपलब्ध झाले आहेत. वेळेवर निदान झाल्यास या गंभीर समस्यांवर उपचार केले जाऊ शकतात. अशातच हृदयरोग असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एक क्रांतिकारी शोध लावलाय. तांदळाएवढ्या पेसमेकरचा हा शोध आहे. या पेसमेकरचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची जैव-विघटनशील रचना आहे. हृदयाचे ठोके नियमित झाल्यावर, साधारण 5 ते 7 आठवड्यांत हे उपकरण शरीरात पूर्णपणे विरघळतं. यामुळे त्याला काढण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही. परिणामी शस्त्रक्रियेशी संबंधित धोके आपोआप टाळले जातील.

कोणासाठी ठरणार वरदान?

हा शोध विशेषतः जन्मजात हृदयविकार असलेल्या नवजात बालकांसाठी आणि हृदय शस्त्रक्रिया झालेल्या प्रौढ रुग्णांसाठी वरदान ठरू शकतो. या क्रांतिकारी शोधामुळे रुग्णांचे उपचार अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

तांदळाच्या दाण्याएवढा हा पेसमेकर कसा काम करतो?

जन्मजात हृदय दोष असलेल्या नवजात बाळांच्या हृदयासाठी हे उपकरणं फायद्याचं ठरणार असल्याचा दावा केला जातोय. यामध्ये इंजेक्शनच्या टोकावर हा पेसमेकर फिट होईल इतका लहान आहे. त्यामुळे हा पेसमेकर कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय सहज शरीरात प्रवेश करू शकतो. पेसमेकर हे एक छोटं इलेक्ट्रॉनिक उपकरण असून ते हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवते.

एरिथमिया (Arrhythmia) म्हणजेच हृदयाचं अनियमित ठोके असलेल्या रुग्णांसाठी हे उपकरणं उपयुक्त आहे. नियमित पद्धतीत पेसमेकर शरीरात बसवण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज असते. सध्या वापरले जाणारे लीडलेस पेसमेकर हेही छोटे असतात. पण त्यांना कॅथेटरच्या साहाय्याने थेट हृदयात बसवावं लागतं. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या इंजिनिअरांनी विकसित केलेला हा पेसमेकर आधुनिक हृदयरोग उपचारांमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे.

नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचा क्रांतीकारी शोध लावला आहे. यामध्ये छोटासा पेसमेकर इंजेक्शनद्वारे थेट हृदयावर बसवता येतो. याला कोणत्याही तारा, बॅटरी किंवा शस्त्रक्रियेची गरज नाहीये. हृदयाचे ठोके नियमित झाल्यावर पेसमेकर शरीरात पूर्णपणे विरघळतो. तांदळाएवढा पेसमेकर रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरणार OR आधुनिक हृदयरोग उपचारांमध्ये एक महत्त्वाचं पाऊल ठरतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT