Child Malnutrition : लवकर ओळख आणि सकस आहार मुलांच्या आरोग्याला देईल दुहेरी बळ, कुपोषणासारख्या गंभीर समस्येपासून राहाल दूर

Children Health Early Diagnosis : कुपोषण ही समस्या सर्व वयोगटातील लोकांवर परिणाम करत असली तरीही लहान मुलांवरील तिचा परिणाम हा मोठा असतो. ज्यामुळे त्यांच्या शारीरिक वाढीत अडथळा निर्माण होतो.
Children Health Early Diagnosis
Children Health Early Diagnosissaam tv
Published On

कुपोषण ही एक अत्यंत भीषण समस्या आहे. जी लक्षावधी मुलांना त्यांच्या आरोग्यापासून, स्वप्नांपासून आणि एक अधिक चांगलं भविष्य घडवण्यापासून वंचित ठेवते. ही समस्या उष्मांक, प्रथिनं, जीवनसत्वे आणि खनिजे यांच्या आहारातील अपुऱ्या मात्रेमधून व त्यांना प्रभावीपणे शोषून घेण्याच्या शरीराच्या अक्षमतेमधून उद्भवते. ही समस्या सर्व वयोगटातील लोकांवर परिणाम करत असली तरीही लहान मुलांवरील तिचा परिणाम हा मोठा असतो. ज्यामुळे त्यांच्या शारीरिक वाढीत अडथळा निर्माण होतो.

लहान मुलांची वाढ खुंटणं ही एक जागतिक खासकरून भारतातील एक लक्षणीय आरोग्य समस्या आहे. जी लक्षावधी लोकांना प्रभावित करते. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या आकडेवारीच्या माहितीनुसार, सुमारे पाच वर्षांखालील सुमारे ३५ टक्‍के मुलांची वाढ खुंटलेली असल्याचं समोर आलं आहे.

बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई, भारत येथील सीनिअर कन्सल्टन्ट डॉ. मुकेश सांकलेचा यांनी याविषयी सांगितलं की, “स्टंटिंगमुळे मुलांच्या केवळ शारीरिक वाढीवर व वजनावरच परिणाम होत नाही तर त्यांचा संज्ञानात्मक विकास, रोगप्रतिकारशक्ती आणि एकूणच स्वास्थ्य कमकुवत होते, ज्याचे परिणाम आयुष्यभर सहन करावे लागतात. याचा सामना करण्यासाठी मुलांच्या वाढीची आणि विकासाची नियमित तपासणी करणं गरजेचं आहे. याशिवाय पोषणातील त्रुटी ओळखण्यासाठी केल्या जाणाऱ्या तपासण्यांना महत्त्व देणं हे आपल्या मुलांच्या अधिक आरोग्यपूर्ण भविष्याची जडणघडण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे.

मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी संतुलित आणि योग्य पोषण अत्यंत गरजेचं असतं. जगभरात पाच वर्षांखालील सुमारे १४.९ कोटी मुलांची वाढ खुंटलेली असून त्यापैकी जवळपास एक तृतीयांश म्हणजेच ४.६ कोटी मुलं – भारतातील आहेत. त्यामुळे मुलांच्या आरोग्यदायी वाढीसाठी आणि विकासासाठी पालकांची भूमिका फार महत्त्वाची ठरते. त्यांच्या सततच्या देखरेखीने आणि योग्य मार्गदर्शनानेच मुलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत वाढण्याची संधी मिळू शकते.

स्टंटिंगची चिन्हं कशी ओळखायची?

बरेचदा सुरुवातीच्या टप्प्यावर समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र ही स्थिती गंभीर रूप धारण करण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्ती काही मुख्य लक्षणं तपासू शकतात. याची लक्षणं काय आहेत ती पाहूयात.

Children Health Early Diagnosis
No Tobacco Day: तंबाखुमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका; पाहा शरीरावर कसा होतो परिणाम

उंची आणि वय यांचं गुणोत्तर

जी मुले आपल्या समवयीन मुलांपेक्षा लक्षणीयरित्या कमी उंचीची असतात त्यांची वाढ खुंटलेली असू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या व्याख्येनुसार स्टंटिंग म्हणजे उंचीसाठी प्रमाण वयाचे Z-गुणांकन सरासरीपेक्षा दोन पातळ्यांहून खाली असणे. एखाद्या मुलाची उंची सातत्याने त्याच्या/तिच्या वयासाठी अपेक्षित प्रमाण वयापेक्षा कमी राहणे.

अपुरे वजन

कालांतराने, वय जरी वाढत असलं तरी शरीराचे वजन अपेक्षेप्रमाणे न वाढणे हे स्टंटिंगचे सुरुवातीचे आणि महत्त्वाचे लक्षण असू शकते.

शारीरिक रचना व स्वरूप

बाहूचा वरचा भाग, मांड्या यांची त्वचा सैल पडलेली असणे, बरगड्या स्पष्टपणे दिसणे किंवा स्नायूंचा अभाव जाणवणे ही शारीरिक लक्षणे स्टंटिंगकडे निर्देश करतात.

विकासातील विलंब

स्टंटिंग झालेल्या मुलांना चालणे, बोलणे यांसारखे विकासात्मक टप्पे गाठण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागतो.

वारंवार आजारपण

स्टंटिंगमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ शकते, त्यामुळे अशा मुलांना वारंवार सर्दी, खोकला, जंतुसंसर्ग यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो.

स्टंटिंग हे मुलांच्या वाढीसमोरील एक गंभीर पण बहुतेक वेळा दुर्लक्षित राहिलेलं आव्हान आहे. मात्र, नियमित आरोग्यतपासणी, योग्य माहितीची जाणीव आणि संतुलित पोषणाच्या सहाय्याने पालक आणि काळजीवाहू व्यक्ती हे मूक संकट ओळखून त्यावर प्रभावीपणे मात करू शकतात, आणि मुलांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक आधार देऊ शकतात.

Children Health Early Diagnosis
Health Care Tips: तुम्हाला पण पचनक्रियेत त्रास होतो का? जाणून घ्या कारण काय आणि उपाय

नियमित आरोग्य तपासणी महत्त्वाची का आहे?

लवकर निदान

जर स्टंटिंगचे निदान वेळेवर झाले, तर मुलाच्या पोषणस्थितीत आणि एकूण आरोग्यात लक्षणीय सुधारणा घडवणारे उपाय वेळेत करता येतात.

माहितीपूर्ण पालकत्व

स्क्रीनिंग आणि आरोग्यतपासण्यांमुळे पालकांना आपल्या मुलाच्या वाढीतील ठळक वा सातत्याने दिसणाऱ्या बदलांची माहिती मिळते. त्यामुळे पोषण व आरोग्यविषयक निर्णय ते अधिक जागरूकतेने आणि माहितीच्या आधारे घेऊ शकतात.

Children Health Early Diagnosis
Fruit Salt in Food: इडली बॅटरसाठी एसिडीटी पळवण्याच्या Fruit salt चा वापर करताय? आजारी पडण्यापूर्वी धोके जाणून घ्याच

संसाधनांपर्यंत वेळेवर पोहोच

समस्या लवकर लक्षात आल्यास, सरकारी किंवा स्वयंसेवी संस्थांच्या पोषणसंबंधी कार्यक्रमांचा लाभ घेणे शक्य होते. त्यामुळे आवश्यक उपचार व सहाय्य वेळेवर मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com