Monsoon Special SAAM TV
लाईफस्टाईल

Monsoon Special : पावसाळ्यात चायनिज खाण्याचे क्रेव्हिंग घरबसल्या होईल पूर्ण, डिनरला बनवा रेस्टॉरंट स्टाइल नूडल्स

Noodle Recipes : पावसाळ्यात बऱ्याचदा आपल्याला चायनिज खाण्याचे क्रेव्हिंग होत असते. अशावेळी बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरीच काही मिनिटांत झटपट रेस्टॉरंट स्टाइल नूडल्स बनवा. सोपी रेसिपी जाणून घ्या.

Shreya Maskar

पावसाळ्यात चटपटीत खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. त्यात पण जर चायनिज खाण्याचे क्रेव्हिंग होत असल्यास आपण बाहेर जाऊन जिभेचे चोचले पुरवतो. पण पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे आरोग्यास घातक ठरते. त्यामुळे घरीच झणझणीत नूडल्स बनवा. हे नूडल्स काही मिनिटांत बनतील. हॉटेलमध्ये नूडल्सचे अनेक प्रकार उपलब्ध असतात. उदा. हक्का नूडल्स, शेजवान नूडल्स, मंच्युरियन नूडल्स

साहित्य

  • नूडल्स

  • कोबी

  • कांदा

  • हिरवी मिरची

  • शिमला मिरची

  • लसूण

  • काळीमिरी पूड

  • मीठ

  • टोमॅटो सॉस

  • सोया सॉस

  • चिली सॉस

  • तेल

  • व्हिनेगर

कृती

नूडल्स बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये थोडेसे मीठ, तेल आणि नूडल्स घालून छान शिजवून घ्या. नूडल्समध्ये तेल घातल्याने नूडल्स मोकळे होतात. एकमेकांना चिकटत नाही. नूडल्स कधीही अर्धवट शिजवावे पूर्ण शिजवू नये. कारण यामुळे त्यांची चव वाढते. गाळणीच्या सहाय्याने नूडल्स मधील पाणी काढून घ्या.

नूडल्स बनविण्याची आता एका पॅनमध्ये तेल गरम करून कांदा, लसूण, हिरवी मिरची खरपूस परतून घ्यावी. त्यानंतर या मिश्रणात शिमला मिरची आणि कोबी घाला. नूडल्स शिजवताना भाज्या जास्त शिजल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण नूडल्समध्ये कच्च्या भाज्यांची चव चांगली लागते. नूडल्समध्ये भाज्यांचा क्रंचीनेस खूप महत्त्वाचा असतो. कारण तो नूडल्स ची चव वाढवतो. भाज्या छान उकडून झाल्यावर त्यामध्ये शिजवलेले नूडल्स, व्हिनेगर , मीठ आणि काळीमिरी पूड घालून सगळं मिश्रण एकत्र करून घ्यावे. नूडल्स मधून छान वाफ येऊ लागल्यावर त्यामध्ये सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि चिली सॉस टाकावे. पुन्हा मिश्रण छान ढवळून घ्यावे. अशा प्रकारे तुमचे नूडल्स तयार झाले. आता गरमागरम नूडल्सचा शेजवान चटणी सोबत आस्वाद घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT